Viral News : अंगणवाडीतील मुलाला पोषण आहारात नकोय उपमा आणि खिचडी! चिकन अन् बिर्याणीची केली मागणी, सरकार बदलणार मेनू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : अंगणवाडीतील मुलाला पोषण आहारात नकोय उपमा आणि खिचडी! चिकन अन् बिर्याणीची केली मागणी, सरकार बदलणार मेनू

Viral News : अंगणवाडीतील मुलाला पोषण आहारात नकोय उपमा आणि खिचडी! चिकन अन् बिर्याणीची केली मागणी, सरकार बदलणार मेनू

Feb 04, 2025 01:27 PM IST

kerala Viral News : केरळमध्ये एका अंगणवाडीत असणाऱ्या शंकू नामक मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने पोषण आहारात थेट चिकन आणि बिर्याणीची मागणी केली आहे. या मुलाचा व्हिडिओ स्वत: केरळच्या एका मंत्र्यांनी शेअर एका आहे.

अंगणवाडीतील मुलाला पोषण आहारात नकोय उपमा आणि खिचडी! चिकन अन् बिर्याणीची केली मागणी, सरकार बदलणार मेनू
अंगणवाडीतील मुलाला पोषण आहारात नकोय उपमा आणि खिचडी! चिकन अन् बिर्याणीची केली मागणी, सरकार बदलणार मेनू (Pixabay)

kerala Viral News : देशभरात शालेली पोषण आहार मुलांना दिला जातो. मुलांचे वजन वाढावे व त्यांची प्रकृती ठीक राहावी या उद्देशाने अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील मुलांना हा पौष्टिक आहार दिला जातो. यात प्रामुख्याने खिचडी किंवा उपमा दिला जातो. मात्र, केरळमध्ये एका अंगणवाडीमध्ये असणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याला पोषण आहारात खिचडी आणि उपमा एवजी बिर्याणी आणि चिकन फ्राय हवे आहे. या व्हिडिओने केरळ सरकारचेही लक्ष वेधले आहे. मुलाचा व्हिडिओ पाहून त्यांनी अशा बालसंगोपन केंद्रांच्या मेन्यू किंवा डिशमध्ये बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. 

केरळ राज्याचे आरोग्य, महिला व बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी आपल्या फेसबुक पेजवर शंकू नावाच्या एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर त्यांनी अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा मेन्यू बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. निरागस पणे मुलाने ही मागणी केली असून त्याच्या या विनंतीवर विचार केला जात असल्याचे देखील  त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ? 

केरळ राज्यातील एका जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात शंकू नामक मुलगा आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. शालेय पोषण आहारात खिचडी वाढतांना त्याने त्या ऐवजी चिकन आणि बिर्याणीची मागणी केली आहे. तो घरी असतांना त्याचा चिकन बिर्याणी खातांनाचा व्हिडिओ काढण्यात आला. यात त्याने ही मागणी केली असल्याचे दिसत आहे. त्याच्या या मागणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अत्यंत निरागसपणे त्याने बिर्याणी आणि चिकनची मागणी केली आहे.  हा व्हिडिओ पाहून थेट मंत्र्यांनी मुलाची आई आणि अंगणवाडी सेविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना म्हटलं की, शंकूची सूचना लक्षात घेऊन अंगणवाडीतील मेन्यूचा आढावा घेतला जाईल. मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे अन्न दिले जाते.

अंगणवाडीत उपमाऐवजी बिर्याणी आणि चिकन हवे आहे, असे टोपी घातलेला मुलगा निरागसपणे आईला सांगताना दिसत आहे. त्याच्या आईने सांगितले की, त्याने घरी बिर्याणी खाताना हा व्हिडिओ शूट केला आणि तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर तो मोठ्या व्हायरल झाला आहे.   

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर