इंदूरमधून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे ६ वर्षाच्या चिमुकल्याचा अजानतेपणी ॲसिड प्यायल्याने मृत्यू झाला. चिमुकला रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईजवळ झोपला होता. यावेळी त्याला तहान लागल्यावर जवळ ठेवलेल्या बाटलीतील ॲसिड पाणी समजून प्यायले. त्यानंतर आठवडाभर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.
ही हृदयद्रावक घटना इंदूर शहरातील बाणगंगा परिसरात घडली. येथे राहणाऱ्या कैलाश अहिरवार यांच्या सहा वर्षाच्या मुलाने माखन याने ५ मे रोजी पाणी समजूनॲसिड प्यायले होते.कुटूंबीयांनी सांगितले की,ॲसिडची बाटली त्याच दिवशी दुपारी फेरीवाल्याकडून खरेदी केली होती.
घटनेविषयी माहिती देताना चिमुकल्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्या रात्री घरात दाल-बाटी पदार्थ बनवला होता. रात्रीचे जेवण करून सर्वजण झोपले होते. माखन त्यांच्यासोबत बेडवर झोपला होता. त्याला तहान लागल्याने त्याने वडिलांकडे पाणी मागितले. त्यांनी पाणी पाजले. त्यानंतर तो बेडवरून खाली उतरून आपली आई रचना जवळ जाऊन झोपला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा तहान लागली. त्याने पाणी मागितल्यानंतर आईने त्याला पाणी देऊन पुन्हा झोपवले.
त्यानंतर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा तहान लागली. त्यावेळी त्याने आई-वडिलांकडे पाणी मागण्याऐवजी स्वत:च उठला वकूलरजवळ ठेवलेल्या बाटलीतील पाणी प्यायला. मात्र ती बाटली ॲसिडची होती. त्यानंतर त्याच्या गळ्यात खवखवू लागल्यानंतर त्याने आईला सांगितले. त्याला उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर आई त्याला घेऊन बाथरूममध्ये गेली. त्याच्या उलट्यामधून ॲसिडचा वास आल्याने ती घाबरली. त्याला विचारल्यानंतर त्याने कोणत्या बाटलीतील पाणी पिले ते सांगितले.
त्यानंतर ही गोष्टी त्याच्या आईने घरच्या अन्य लोकांना सांगितले.रात्रीच्या वेळीच ते मुलाला घेऊन रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्याच्यावर ८ दिवस उपचार केले गेले. मात्र त्याचा जीव वाचला नाही. मुलाचे आई-वडील खासगी नोकरी करतात. त्यांनी ५ तारखेला दुपारीच घराच्या सफाईसाठी ॲसिडखेरदी केली होते.
मात्र मुलाला याची माहिती नसल्याने व दिसायला पाण्यासारखे असल्याने ते पाणी समजून पिले. माखन त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक मोठी बहीण आहे. पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह कुटूंबीयांच्या हवाली केला.