इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश'
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश'

इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश'

Jan 22, 2025 11:29 AM IST

गाझामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोन दिवसांनी ७ ऑक्टोबररोजी झालेल्या हल्ल्यानंतर राजीनामा देणारे इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी हे इस्रायलचे सर्वात प्रमुख अधिकारी आहेत.

इस्त्रायल लष्करप्रमुखाचा राजीनामा
इस्त्रायल लष्करप्रमुखाचा राजीनामा

७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्त्रायली नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. सुरक्षेतील या चुकीसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी यांनी राजीमाना दिला आहे. गाझा पट्ट्यामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोनच दिवसांनी इस्त्रायली लष्कराच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने राजीमाना दिल्याने इस्त्रायलमध्ये गाझा युद्धावरून इस्रायलमध्ये वरिष्ठ स्तरावर असलेला बेबनाव उघड झाला आहे. 

‘हमास’च्या या हल्ल्यानंतर इस्त्रायल-हमासदरम्यान तब्बल १५ महिने युद्ध सुरू होते. इस्त्रायलच्या गाझावरील हल्ल्यानंतर ५० हजारापेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर इमारतींचा विनाश झाला होता. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतरसुद्धा हमासचा गाझा या प्रदेशावर आजही भक्कम ताबा आहे. दरम्यान, इस्रायल-हमासदरम्यानच्या शस्त्रसंधीने हमासला पुन्हा जुळवाजुळव करण्याची संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. 

हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात सुमारे १,२०० लोक मारले गेले होते. तर २५० जणांचे अपहरण करण्यात आले होते. हमासने गाझामध्ये अजूनही ९० हून अधिक इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहेत. त्यापैकी बऱ्याच ओलिसांचा मृत्यू झाल्याचे समजते.

प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात ५० हजाराहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचे गाझाच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत असं या अधिकाऱ्याने सांगितले. 

लष्करी अधिकाऱ्याने राजीनामा पत्रात काय म्हटलय?

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी यांनी इस्रायलचे संरक्षण मत्री इस्त्रायल काझ यांना आपला राजीनामा पाठवून दिला आहे. या राजीनामा पत्रात ते लिहितात, ‘हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा माझ्याच नेतृत्वाखालील लष्कर इस्रायलचे रक्षण करण्याच्या ध्येयात अपयशी ठरले. या भयानक अपयशाची जबाबदारी मला दररोज, तासा-तासाला सतावत होती. हे अपयश संपूर्ण आयुष्य माझा पिच्छा पुरवणार आहे. परंतु त्यानंतरच्या युद्धात लष्कराने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. लष्कराने ‘महत्त्वपूर्ण यश’ मिळविल्यानंतर मी बाहेर पडतोय. तरीसुद्धा इस्रायलची युद्धाबाबतची ‘सर्व उद्दिष्टे’ अद्याप पूर्ण झालेली नाहीत. हमास आणि त्यांच्या क्षमतांना आणखी खिळखिळे करण्यासाठी, ओलिसांना परतणे सुनिश्चित करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या इस्रायलींना घरी परतण्यास सक्षम करण्यासाठी आमचे सैन्य लढत राहणार आहे' असं हर्झी हालेवी यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर