CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा

CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा

HT Marathi Desk HT Marathi
Published Mar 13, 2025 10:11 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधानांशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधानांशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. शिवाय नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे नागपूर येथील विमानतळाच्या कामातील अडसर लवकरच दूर होतील, असं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा याबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केल्याचे कळते. या बाबतीत पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते.

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत ‘वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट’ होणार आहे. ही समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यानिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे. त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

मुंबईत बीकेसी येथे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होऊ घातलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट’मध्ये मीडिया आणि एन्टरटेंटमेंट उद्योगाबाबत चर्चा, सहकार्य आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ असून या समिटमध्ये या उद्योगक्षेत्रातील प्रमुख अधिकारी, भागधारक आणि नवोन्मेषक एकत्र येऊन या क्षेत्रात उपलब्ध संधी तसेच आव्हाने यावर चर्चा करणार आहेत. तसेच या क्षेत्रातील जागतिक व्यापाराला चालना देऊन या क्षेत्राच्या भविष्यावर चर्चा होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर