अंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या-chhattisgarh news murder in superstition five including three women were killed on suspicion of witchcraft ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

अंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

Sep 15, 2024 07:30 PM IST

छत्तीसगडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे गावकऱ्यांनी एकाच वेळी पाच जणांची हत्या केली. याचे कारण जादूटोणा असल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे.

जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या
जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

Chhattisgarh news : छत्तीसगडमधील आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील एका गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून तीन महिलांसह पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या (Murder in superstition)  करण्यात आली.  यामध्ये दोन जोडप्यांचा समावेश आहे.  काळी जादू करत असल्याच्या संशयातून गावातील लोकांनी पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. या हत्येप्रकरणी गावातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. 

ही घटना कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकताल गावात घडली. मौसम कन्ना आणि त्याची पत्नी मौसम बिरी, मौसम बुचा आणि त्याची पत्नी मौसम आरजू अशी मृतांची नावे आहेत. तिच्यासोबत लच्छी नावाच्या आणखी एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.

हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सावलम राजेश, सावलम हिडमा, करम सत्यम,  कुंजाम मुकेश आणि पोडियाम एन्का अशी आरोपींची नावे आहेत.

अशीच एक घटना गुरुवारी बलौदाबाजार-भाटपाडा जिल्ह्यात घडली. जादूटोणा केल्याच्या संशयावरून ११ महिन्यांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती.

चेटकीण असल्याच्या संशयातून दोन महिलांना विवस्त्र करून मारहाण -

चेटकीण असल्याच्या संशयातून दोन महिलांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वरमध्ये ही घटना घडली. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत परिसरातील कालव्यात फेकले. या घटनेत दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून यामुळे खळबळ माजली आहे. आदिवासी समाजातील लोकांनी पंचायत बोलवून दोन्ही महिलांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

गावकऱ्यांनी या महिलांना चेटकीण म्हणत जबरदस्तीने त्यांच्या घरातून ओढून नेले. त्यानंतर सर्वात प्रथम त्यांचे कपडे काढण्यात आले. नंतर त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये महिलांचा मृत

 

Whats_app_banner
विभाग