गणेश मंडळाने मोठ्या आवाजात म्यूझिक सिस्टीम लावल्याने त्रस्त व्यक्तीने संपवले जीवन, सुसाइड नोटमधून झाला खुलासा-chhattisgarh news man upset by the loud music of ganesh pandal hanged himself ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गणेश मंडळाने मोठ्या आवाजात म्यूझिक सिस्टीम लावल्याने त्रस्त व्यक्तीने संपवले जीवन, सुसाइड नोटमधून झाला खुलासा

गणेश मंडळाने मोठ्या आवाजात म्यूझिक सिस्टीम लावल्याने त्रस्त व्यक्तीने संपवले जीवन, सुसाइड नोटमधून झाला खुलासा

Sep 17, 2024 04:24 PM IST

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने मोठ्या आवाजात गाणी लावल्याने वाद झाला व प्रकरण वाढत गेले. पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने सुसाईड नोटही लिहिली आहे.

मोठ्या आवाजात गाणी लावल्याने व्यक्तीची आत्महत्या
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने व्यक्तीची आत्महत्या

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण गणेश मंडपात वाजणारे संगीत आहे. खरं तर जुना भिलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखोज परिसरात राहणाऱ्या धन्नूलाल साहू यांना गणेश मंडपात मोठ्या आवाजात संगीत वाजण्यास आक्षेप होता. याबाबत त्यांनी मंडपाच्या आयोजकांकडे तक्रार केली असता हे प्रकरण ताणले गेले आणि वाद सुरू झाला. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून शांत केले, मात्र सकाळी धन्नूने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

हृदयरोग असूनही मोठ्या आवाजात संगीत -

धन्नू लाल साहू  त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत राहतात. शनिवारी रात्री घराजवळील गणेश मंडपात स्पीकर वाजण्याच्या मोठ्या आवाजावर त्यांनी आक्षेप घेतला. साहू यांनी मंडप समितीला सांगितले होते की, त्यांना हृदयाशी संबंधित आजार आहे. असे असूनही  मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. गणेश मंडळाने साहू यांच्या विनंतीकडे लक्ष न दिल्याने त्यांनी आपत्कालीन पोलिस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर फोन केला, त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मंडप समितीला साऊंड सिस्टीम बंद करण्याचे आदेश दिले आणि दोन्ही बाजुला शांत करून तेथून निघून गेले. दोन्ही बाजूच्या लोकांमधील वाद अजूनही सुरूच होता. प्रकरण शांत होत नसल्याचे पाहून दोन्ही बाजूचे लोक पोलिस ठाण्यात पोहोचले. परंतु दोघांनीही तेथे तक्रार दाखल केली नाही. यानंतर सर्वजण पुन्हा घरी गेले. पण त्यानंतर असं काही घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. रविवारी सकाळी साहू यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे. हे पत्र साहू यांनी लिहिल्याची माहिती आहे. पत्रात साहू यांनी संबंधित मंडप समितीचे सदस्य गोल्डी वर्मा यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Whats_app_banner
विभाग