खळबळजनक! काँग्रेस नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं, एकामागून एक चार जणांचं आयुष्य संपवलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! काँग्रेस नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं, एकामागून एक चार जणांचं आयुष्य संपवलं

खळबळजनक! काँग्रेस नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं, एकामागून एक चार जणांचं आयुष्य संपवलं

Published Sep 01, 2024 11:34 AM IST

congress leader suicide : छत्तीसगडमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एका काँग्रेस नेत्यानं कुटुंबासह आत्महत्या केली आहे.

काँग्रेस नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं, एकामागून एक चार जणांचं आयुष्य संपवलं
काँग्रेस नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं, एकामागून एक चार जणांचं आयुष्य संपवलं

chhattisgarh congress leader suicide : छत्तीसगडमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आत्महत्या केली आहे. जंजगीर-चंपा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केली. यामध्ये मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर काँग्रेस नेते, त्यांची पत्नी आणि लहान मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत बिलासपूरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे आज रविवारी सकाळी तिघांचाही मृत्यू झाला.

पंचराम यादव (वय ६६), त्यांची पत्नी दिनेश नंदानी यादव (वय ५५), मुलगा नीरज यादव (वय २८), सूरज यादव (वय २५), अशी चौघांची नावे आहेत. या सर्वांनी ३० ऑगस्ट रोजी एकत्र विष प्राशन केले होते. संपूर्ण कुटुंब कर्जामुळे त्रस्त असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कारण काय ?

कोणाला कळू नये म्हणून पंचराम यादव त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावले होते आणि मागच्या दाराने गेल्यावर त्यांनी आतून दरवाजाही बंद केला होता. शेजारी राहणारी मुलगी त्याच्या घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. दोन-तीन वेळा फोन करूनही त्यांनी दार उघडले नाही, तेव्हा काहीतरी गैरप्रकार झाल्याच्या भीतीने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. शेजारी व नातेवाईकांनी घरात गेले असता सर्वजण गंभीर अवस्थेत पडले होते. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर, तिघांवर उपचार सुरू असतांना, आज सकाळी त्यांचाही मृत्यू झाला.

तपास सुरू 

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेमके आर्थिक कारण होते की दुसरे काही याचा तपास पोलिस घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर