छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार; अजूनही चकमक सुरूच
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार; अजूनही चकमक सुरूच

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार; अजूनही चकमक सुरूच

Feb 01, 2025 07:32 PM IST

Naxal Encounter : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. शनिवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक (PTI/File)

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे.  गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडका भागात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमद्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.

नक्षलविरोधी मोहिमेत जवान व नक्षलवाद्यांमध्ये सतत चकमकी होत आहेत. सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोडका परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत किंवा अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यात कारवाई सुरू केली. यात त्यांची माओवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत आठ माओवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांची संख्याही वाढू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत नक्षलवाद्यांना घेरल्याचे सांगण्यात येत आहे. ही चकमक अजूनही सुरूच आहे. या चकमकीत सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान सहभागी झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. बस्तरमधून नक्षलवाद संपवण्यासाठी मार्च-२०२६ ची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सकाळी साडेआठच्या सुमारास चकमक सुरू झाली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे संयुक्त पथक माओवादविरोधी मोहिमेसाठी निघाले असताना चकमक उडाली.

छत्तीसगडमधील विजापूर येथे माओवाद्यांनी आययडीने केलेल्या स्फोटात जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) आठ जवान आणि एका चालकाचा मृत्यू झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या वचनाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.

राज्य पोलिसांच्या डीआरजी या तुकडीवर झालेला माओवाद्यांचा हल्ला हा गेल्या दोन वर्षांतील माओवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेला सर्वात मोठा हल्ला होता. २६ एप्रिल २०२३ रोजी शेजारच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यातील वाहन उडवून दिल्याने १० पोलीस कर्मचारी आणि एका नागरी ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता.

विजापूरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे, पण मी तुम्हाला खात्री देतो की, आपल्या सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर