Viral News : तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील श्री रामचंद्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नाने एका मुलाचे प्राण वाचवले. या मुलाने चुकून एलईडी बल्ब गिळला जो त्याच्या फुफ्फुसात जाऊन अडकला होता. मुलाने बल्ब कसं गिळला असेल याचे आश्चर्य डॉक्टरांनाही वाटले. गेल्या शुक्रवारी मुलाला खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या पालकांनी त्याला दवाखान्यात भरती केले. यावेळी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५ वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात एलईडी बल्ब असल्याचे दिसले. मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करून हा बल्ब बाहेर काढला. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तानुसार, एलईडी गिळलेल्या मुलाला आधी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दवाखान्यात मुलावर ब्रॉन्कोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचे दोन वेळा प्रयत्न करण्यात आले जे अयशस्वी झाले. त्यानंतर रुग्णालयाने ओपन चेस्ट सर्जरी करून बल्ब बाहेर काढण्याचा सल्ला दिला. ही मोठी शस्त्रक्रिया असल्याने पालकांनी मुलाला चेन्नई येथील श्री रामचंद्र रुग्णालयात नेले. येथे, सीटी स्कॅनच्या मदतीने, एसआरएच वैद्यकीय पथकाने मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला एलईडी बल्ब शोधून काढला. यानंतर उपचारासंबंधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
रुग्णालयाने सांगितले की, 'बालकाच्या पालकांना ब्रॉन्कोस्कोपीद्वारे एलईडी बल्ब काढण्याच्या प्रक्रियेबद्दल समजावून सांगण्यात आले. ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास, ओपन चेस्ट सर्जरी आणि पोस्टऑपरेटिव्ह इंटेसिव्ह केअर युनिट (ICU) आणि वेंटिलेशन उपचार देखील त्यांना सुचवले गेले. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ब्रॉन्कोस्कोपीद्वारे एलईडी बल्ब बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टरांनी सांगितले की मुलाला आयसीयू किंवा वेंटिलेशनची आवश्यकता नाही. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला शस्त्रक्रिया केल्यावर घरी सोडण्यात आले. या बालकाची प्रकृती आता स्थिर असून तो पूर्णपुणे बरा झाला आहे. डॉक्टरांनी केलेली ही शस्त्रक्रिया सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून नागरिकांनी याचे मोठे कौतुक केले जात आहे.
संबंधित बातम्या