अल्पवयीन मोलकरणीला गरम लोखंड आणि सिगारेटचे चटके, हत्या करून मृतदेह शौचालयात टाकला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अल्पवयीन मोलकरणीला गरम लोखंड आणि सिगारेटचे चटके, हत्या करून मृतदेह शौचालयात टाकला

अल्पवयीन मोलकरणीला गरम लोखंड आणि सिगारेटचे चटके, हत्या करून मृतदेह शौचालयात टाकला

Nov 03, 2024 11:38 PM IST

मोहम्मद निषाद आणि नासिया अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी आपल्या मोलकरणीची हत्या करून तिचा मृतदेह शौचालयात टाकला होता.

अल्पवयीन मुलीची हत्या
अल्पवयीन मुलीची हत्या (iStock photo)

चेन्नईत एका १५ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नी असलेल्या दोघांना अटक केली आहे. तसेच अन्य ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता नगरमधील एका फ्लॅटमध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिला प्रचंड शारिरीक यातना देण्यात आल्याचे समोर आले आहे. पीडितेला गरम लोखंड आणि सिगारेटचे चटके देण्यात आले होते. 

मोहम्मद निषाद आणि नासिया अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी आपल्या मोलकरणीची हत्या करून तिचा मृतदेह शौचालयात सोडला होता. त्यानंतर ते निषादच्या बहिणीच्या घरी पळून गेले. त्यांच्या वकिलांनी पोलिसांना मृत्यूची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पीडितेची आई तंजावूर जिल्ह्यातील रहिवासी असून विधवा आहे. मुलीच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

मामाचा चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार -

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर तिच्याच नातेवाईकाने बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेची गंभीर दखल घेत महिलांविरोधात गुन्हा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

तिरुपती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायुडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे मामा नागराजू (२४) यांनी तिला खायला घालण्यासाठी काहीतरी आमिष दाखवले आणि शुक्रवारी संध्याकाळी तिला एएम पुरम गावातील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने चिमुरडीवर बलात्कार केला. नागराजू हा मुलीच्या घराजवळ राहतो आणि रोज तिच्यासोबत खेळत असे. शुक्रवारी सायंकाळी तो तिला एका दुकानात घेऊन गेला आणि तेथून काही खाद्यपदार्थ खरेदी केले. त्यानंतर त्याने मुलीला तिच्या घरापासून दूर एका निर्जन ठिकाणी नेले, तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर