Viral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल

Viral News : धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल

Nov 22, 2024 11:53 AM IST

Viral News : चेन्नईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने 'होम बर्थ एक्सपीरियंस' नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा भाग आहेत. या ग्रुपवर माहिती विचारून त्यांनी घरीच बाळाला जन्म दिला.

धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल
धक्कादायक! डॉक्टरांकडे न नेता व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करून केली पत्नीची प्रसूती; गुन्हा दाखल

Viral News : चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एका जोडप्याने दवाखान्यात न जाता घरातच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही माहिती विचारून ही डिलिव्हरी करण्यात आली आहे.  ही घटना व्हायरल झाल्यावर पोलिसांना या प्रकरणी तपास करावा लागला.  डॉक्टरांचा सल्ला न घेताच या दाम्पत्याने घरीच बाळाला जन्म दिल्याचा आरोप आहे. या साठी 'होम बर्थ एक्सपीरियंस' या ग्रुपवर माहिती विचारून पतीने पत्नीची घरीच प्रसूती केली. या ग्रुपमध्ये तब्बल एक हजारांहून अधिक जण सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनी जशी माहिती दिली त्यानुसार या  जोडप्याने  प्रसूती केली. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या प्रकरणी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  

३६  वर्षीय मनोहरन आणि त्यांची ३२ वर्षीय पत्नी सुकन्या हे दोघे जण 'होम बर्थ एक्सपीरियंस' नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य आहेत. हा ग्रुप घरीच बाळाची प्रसूती कशी करावी याचा सल्ला देतात. या ग्रुपमध्ये या बाबत मार्गदर्शन करणारे अनेक सदस्य आहेत. या जोडप्याने आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. त्यांना ८  आणि ४  वर्षांच्या दोन मुली आहेत. जेव्हा सुकन्या ही  तिसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा त्यांनी तिची प्रसूती ही घरीच करायचे ठरवले.  त्यांनी वैद्यकीय तपासणी देखील न करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण गरोदरपणात कोणतीही चाचणी करण्यात आली नाही.

पती पत्नीवर गुन्हा दखल 

या प्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी या दाम्पत्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.  अशा परिस्थितीत या दाम्पत्याने रुग्णालयात जाण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा आधार घेत घरीच प्रसूती केली.  मनोहरन यांनी स्वत:हून पत्नी सुकन्या हीची प्रसूती केली. दरम्यान,  बाळाचा जन्म झाला. त्यांच्या या प्रसूतीची सोशल मिडियावर मोठी चर्चा झाली. हे प्रकरण व्हायरल झाल्यावर या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली.  सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कुंद्राथुर पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. मनोहरन यांनी जे केले ते वैद्यकीय सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे, अशी माहिती पोलिसांनी  न्यायालयाला दिली आहे. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी मनोहरन यांची चौकशी केली. तपासादरम्यान त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची माहिती मिळाली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर