Kuno National Park News: मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता 'गामिनी'ने १० मार्चला पाच बछड्यांना जन्म दिल्याची माहिती देण्यात आली. पंरतु, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत चित्ता गामिनीने सहा बछड्यांना जन्म दिल्याची माहिती दिली. यासह चित्ता गामिनीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.
केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी मादी गामिनीच्या बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की,"मी खूप आनंदी आहे, मादी गामिनीने पाच नव्हेतर सहा बछड्यांना जन्म दिला आहे! सुरुवतातील गामिनीने पाच बछड्यांना जन्म दिल्याची माहिती मिळाली. परंतु, नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकन चित्ता गामिनीने सहा बछड्यांना जन्म दिल्याचे समजले. जो एक विक्रम आहे." पहिल्यांदा आई झालेल्या चित्ता मादीमध्ये सहा बछड्यांना जन्म देणारी गामिनी पहिलीच आहे. आतापर्यंत कोणत्याही मादी चित्ताने पहिल्यांदा आई होताना पाच पेक्षा जास्त बछड्यांना जन्म दिला नाही.
फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते उद्यानात आणण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या गटात गामिनीचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चपासून ज्वालाच्या पोटी जन्मलेल्या तीन बछडय़ांसह १० चित्ते दगावली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बिबट्यांची एकूण संख्या २७ झाली आहे. ज्यात सहा नर आणि सात मादीं यांच्यासह १४ बछड्यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या