Chardham Yatra 2024: ६ महिन्यात ५३ भाविकांचा मृत्यू, चार धामात मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यूचे कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chardham Yatra 2024: ६ महिन्यात ५३ भाविकांचा मृत्यू, चार धामात मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यूचे कारण काय?

Chardham Yatra 2024: ६ महिन्यात ५३ भाविकांचा मृत्यू, चार धामात मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यूचे कारण काय?

Nov 03, 2024 03:30 PM IST

Chardham Yatra death : १० मे पासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये यावर्षी आतापर्यंत ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यमुनोत्री धाममधील ४० आणि गंगोत्री धाममधील १३ भाविकांचा समावेश आहे.

चारधाम यात्रामध्ये ६ महिन्यात ५३ जणांचा मृत्यू
चारधाम यात्रामध्ये ६ महिन्यात ५३ जणांचा मृत्यू (HT Photo)

Chardham yatra 2024  : उत्तराखंड चारधाम यात्रा २०२४ नोव्हेंबर महिन्यात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गंगोत्री धामचे कपाट २ नोव्हेंबरला बंद झाल्यानंतर ३ नोव्हेंबरला केदारनाथ धामचे कपाट बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर यमुनोत्री धामचे कपाटही रविवारी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी विधीपूर्वक बंद करण्यात आले आहेत.

१० मे पासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये यावर्षी आतापर्यंत ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यमुनोत्री धाममधील ४० आणि गंगोत्री धाममधील १३ भाविकांचा समावेश आहे.

अवघड चढाईबरोबरच हवामानातील बदल हे भाविकांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आजारी आणि वृद्ध भाविकांनी संपूर्ण आरोग्य तपासणी करूनच चारधाम यात्रेला जावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

चारधाम यात्रा मार्गावर ३ भाविक बेपत्ता आहेत. ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मागील वर्षाचा विचार केला तर २०२३ मध्ये यमुनोत्री धाममध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी यमुनोत्रीमध्ये ४१ आणि गंगोत्रीमध्ये २१ भाविकांना आपला जीव गमवावा लागला.

१५ लाखाहून अधिक भाविक गंगोत्री-यमुनोत्रीत दाखल -

गंगोत्री धामचे कपाट शनिवारी विधिवत पूजा केल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यमुनोत्री धामचे कपाटही बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु या सहा महिन्यांच्या यात्रेच्या कालावधीत यंदा विक्रमी संख्येने भाविक या दोन्ही धामांच्या मंदिरात दाखल झाले आहेत.

आतापर्यंत १५ लाख २१ हजार ७५२ भाविकांनी दोन्ही धामांना भेट दिली आहे. त्यापैकी ७ लाख १० हजार २१० भाविकांनी यमुनोत्री धाम, तर ८ लाख ११ हजार ५४२ भाविकांनी गंगोत्री धामचे दर्शन घेतले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या कपाटोद्घाटनाने १० मे रोजी सुरू झालेल्या चारधाम यात्रेचा सध्याचा हंगाम आता संपत आला आहे.

भाऊबीजच्या मुहूर्तावर यमुनोत्री मंदिराचे कपाट रविवारी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी बंद होणार आहेत. या दोन धामांच्या तुलनेत गेल्या वर्षीचा आढावा घेतला तर २२ एप्रिल २०२३ रोजी कपाटोद्घाटनानंतर १४ नोव्हेंबर २०२३ रोजी गंगोत्री मंदिराचे दरवाजे आणि १५ नोव्हेंबर २०२३ रोजी यमुनोत्री मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.

अशा प्रकारे गेल्या वर्षी गंगोत्री धामची यात्रा २०७ दिवस आणि यमुनोत्री धाम यात्रा २०८ दिवस चालली होती. ज्यामध्ये ९०,५४५६ भाविकांनी गंगोत्री धामला तर ७३,७२४५ यात्रेकरूंनी यमुनोत्री धामला भेट दिली.

यंदा गंगोत्री धामचा यात्रा कालावधी १७७ दिवसांचा तर यमुनोत्री धामचा कालावधी १७८ दिवसांचा आहे. असे असूनही १५ लाखांहून अधिक भाविक मां गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन घेऊन परतले आहेत.

बद्रीनाथ धामचे कपाट १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०७ वाजता बंद केले जातील. बद्रीनाथ मंदिराचे कपाट बंद होण्यापूर्वी भाविकांना देवाचे दर्शन घ्यायचे आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून दररोज हजारो भाविक बद्रीनाथ धाममध्ये दाखल होत आहेत. शनिवारीही ६५०० हून अधिक भाविक बद्रीनाथला पोहोचले. पोलिस प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत यात्रा कालावधीत १२ लाख ७४ हजारांहून अधिक भाविक बद्रीनाथ धाममध्ये दाखल झाले.

या वेळी डोंगरांमध्ये हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे बद्रीनाथसह सर्वच मंदिरांमध्ये केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. बद्रीनाथचे कपाट बंद होण्यापूर्वी निसर्ग आणि देव या दोघांच्या दर्शनासाठी भाविक येथे येत आहेत. सर्व सामान्य आणि खास लोक देवाच्या दरबारात प्रणाम करण्यासाठी पोहोचत आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर