Chandrayaan 3: चांद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर प्रथम काय करणार? 'हा' आहे इस्रोचा प्लॅन; नासाही मागे पडेल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrayaan 3: चांद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर प्रथम काय करणार? 'हा' आहे इस्रोचा प्लॅन; नासाही मागे पडेल

Chandrayaan 3: चांद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर प्रथम काय करणार? 'हा' आहे इस्रोचा प्लॅन; नासाही मागे पडेल

Updated Aug 21, 2023 07:54 AM IST

Chandrayaan 3: रशियाचे लुना २५ हे यान चंद्रावर कोसळल्यावर जगाचे लक्ष आता चंद्रयान ३ वर आहे. ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आहे. चांद्रयान ३ येत्या बुधवारी (२३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँडिंग करणार आहे. उतरल्यावर हे यान इतिहास रचणार आहे.

Chandrayaan 3
Chandrayaan 3

Chandrayaan-3 Latest Updates: रशियाचे लुना २५ हे यान चंद्रावर कोसळल्यावर जगाचे लक्ष आता चंद्रयान ३ वर आहे. ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आहे. चांद्रयान ३ येत्या बुधवारी (२३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँडिंग करणार आहे. उतरल्यावर हे यान इतिहास रचणार आहे. चंद्रयान चंद्रावर उतरल्यावर खास शोध मोहीम हाती घेणार आहे. यात जर हे यान यशस्वी झाले तर इस्रो नासालाही मागे टाकेल. खरं तर, २००८ मध्ये जेव्हा चांद्रयान १ ने डेटा पाठवायला सुरुवात केली तेव्हा नासाने २४ सप्टेंबर २००९ रोजी चंद्रयान १ च्या डेटाच्या आधारे चंद्राच्या दक्षिणेकडील भागात बर्फ असल्याचे पुरावे असल्याचे घोषित केले होते.

Chandrayaan 3: चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट; कोणत्या दिवशी आणि किती वाजता चंद्रावर लँडिंग करणार? वाचा

विक्रम लँडरचे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग झाल्यानंतर यातील रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर उतरून त्याची शोधमोहीम सुरू करणार आहे. यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) हे रोव्हर माहिती पाठवण्यास सुरुवात करणार आहे. इस्रोने या माहितीच्या विश्लेषणासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील केली आहे. यासाठी विविध शास्त्रज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे.

Maharashtra weather update: विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट

चांद्रयान-३ ने पाठवलेल्या कोणत्याही माहितीवर आधारित शोधनिबंध प्रथम एजन्सीनेच जाहीर करावा, असा इस्रोचा प्रयत्न आहे. वास्तविक, २००८ मध्ये चांद्रयानने पाठवलेल्या डेटाच्या मदतीने नासाने यापूर्वीच चंद्रावर बर्फ असल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच यावेळी चंद्रयान ३ मोहिमेत इस्रोने जय्यत तयारी केली आहे.

लँडिंग केल्यानंतर चंद्रयानातून, प्रज्ञान रोव्हर बाहेर पडणार आहे. यानंतर ते माहिती गोळा करण्यासाठी १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) या दोन उपकरणांपैकी एक चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण करणार आहे तर लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) चंद्रयाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या धातूचा शोध आणि त्याची माहिती गोळा करणार आहे.

इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही उपकरणांचे तंत्रज्ञान वेगळे असून काम जवळपास सारखेच आहे. ही उपकरणे आपोआप काम करतील आणि त्याचा डेटा रोव्हरमधून थेट विक्रम लँडरपर्यंत आणि नंतर प्रोपल्शन नोड्यूलपर्यंत पोहोचेल. ही दोन्ही उपकरणे इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) शी जोडली जातील. कर्नाटकातील ब्यालाल येथील या प्रयोगशाळेला थेट डेटा मिळेल आणि शास्त्रज्ञ त्यांचे विश्लेषण सुरू करतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर