मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrayaan 3 नंतर ISRO ला मोठं यश, Aditya L1 यानाने घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

Chandrayaan 3 नंतर ISRO ला मोठं यश, Aditya L1 यानाने घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 08, 2023 11:15 PM IST

Aditya L-1 Mission : इस्रोच्या पहिल्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल-1 नेही लक्षवेधी कामगिरी केली आहे. यानाने सूर्याचे पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो क्लिक केले आहेत.

Aditya L-1 Mission
Aditya L-1 Mission

Aditya L1 Mission : चंद्रयान- ३ च्या यशानंतर इस्त्रोच्या पहिल्या सूर्य मिशन आदित्य एल-1 नेही कमाल केली आहे. अंतराळ यानावर लावण्यात आलेल्या सोलर अल्ट्रावॉयलट इमेजिंग टेलीस्कोप (SUIT) इंस्ट्रूमेंटने २००-४०० एनएम वेवलेंथ रेंजमध्ये सूर्याचे पहिल्यादांच फुल-डिस्क फोटो यशस्वीपणे कॅप्चर केले आहेत. SUIT विविध वैज्ञानिक फिल्टरचा वापर करून या वेवलेंथ रेंजमध्ये सूर्याची कक्षा व क्रोमोस्फीयरचे फोटो कॅप्चर करते.

इस्त्रोने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) द्वारे क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विविध रंगातील फोटोंमध्ये सूर्य दिसत आहे. इस्त्रोने सांगितले की, ''२० नोव्हेंबर २०२३ रोजी SUIT पेलोड सुरू केले होते. आदित्य-L1 चा SUIT पेलोड २० नोव्हेंबर २०२३ रोजी अॅक्टिव्ह झाला. एका यशस्वी प्री-कमीशनिंग टप्प्यानंतर टेलीस्कोपने ६ डिसेंबर २०२३ रोजी सूर्याचा पहिला फोटो पाठवला होता.तो लाईट सायन्स फोटो होता. ११ वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करून घेण्यात आलेल्या याअभूतपूर्व फोटोंमध्ये पहिल्यांदाच सूर्याचे फुल डिस्क फोटोंचा समावेश आहे.

 

आदित्य एल १यानाने सूर्याचे फुल डिस्क इमेज घेतले आहेत. म्हणजेच सूर्याच्या त्या भागाचा फोटो, जो पूर्णपणे समोर आहे. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग, प्लेग आणि सूर्याचा शांत असलेला भाग स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा योग्य अभ्यास करू शकणार आहेत.

आदित्य एल १ यानातील दुर्बिणीने सूर्यप्रकाशातील फोटोस्फियर (Photosphere) आणि क्रोमोस्फिअरचे (Chromosphere) फोटो घेतले आहेत. फोटोस्फियर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फियर म्हणजे, सूर्याचा पृष्ठभाग आणि बाह्य वातावरणातील पातळ थर. क्रोमोस्फियरचा विस्तार सूर्याच्या पृष्ठभागापासून २ हजार किलोमीटरपर्यंत आहे.

WhatsApp channel

विभाग