मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrababu Naidu : आंध्रात ५ वर्षानंतर ‘चंद्रा’बाबूंचा उदय; TDP चे सत्तेत पुनरागमन, मोदी ३.० मध्ये ठरणार किंगमेकर!

Chandrababu Naidu : आंध्रात ५ वर्षानंतर ‘चंद्रा’बाबूंचा उदय; TDP चे सत्तेत पुनरागमन, मोदी ३.० मध्ये ठरणार किंगमेकर!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 04, 2024 05:46 PM IST

Andhra Pradesh Assembly Election Result : लोकसभा निवडणुकीत आंध्रांतTDP १६ जागांवर आघाडीवर आहे तर जगन मोहन रेड्डी यांचाYSRCP केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप३ तर पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

आंध्रात तेलुगु देसम पाच वर्षांनी सत्तेत परतला
आंध्रात तेलुगु देसम पाच वर्षांनी सत्तेत परतला

Lok Sabha Election Result : आंध्र प्रदेशसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे.एकीकडे राज्याच्या सत्तेत चंद्राबाबू नायडू ५ वर्षानंतर पुनरागमन करत आहेत तर तेलुगु देसम पक्ष लोकसभा निवडणुकीतही मोठी उलथपालथ करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कलानुसार चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (TDP) २५ पैकी १६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे केंद्रात मोदी सरकार स्थापन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे. कारण भाजप केवळ २३९ जागांवर ओटापताना दिसत आहे. जर एनडीए केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असेल तर यामध्ये TDP ची भूमिका महत्वपूर्ण असेल.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान विधानसभा निवडणुक निकालाबाबत बोलायचे तर राज्याच्या १७५ जागांपैकी १३० वर तेलुगु देसम पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर २ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे त्यांच्याकडे १३२ जागांचे बहुमत आहे.

आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच राज्याच्या विधानसभेसाठीही मतदान पार पडले होते. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात YSRCP ने आंध्र प्रदेशातील सर्व १७५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर NDA अंतर्गत टीडीपीने १४४, जनसेना पार्टीने २१ तर भाजपने १० जागांवर विधानसभा लढवली होती. तर लोकसभेच्या १५ जागांपैकी TDP ने १७, भाजपने ६ तर जनसेना पार्टीने २ जागा लढल्या होत्या. आता निवडणूक निकालाने स्पष्ट झाले की, चंद्राबाबू नायडूंची लोकप्रियता कायम आहे. आंध्राच्या जनतेने TDP ला विधानसभा आणि लोकसभा दोन्हीसाठी पसंती दिली आहे.

राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षाआधीपर्यंत आंध्रात सर्वकाही जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी अनुकूल होते. जनतेत त्यांची लोकप्रियता वाढली होती. मात्र मागच्या वर्षी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना केलेली अटक टर्निंग प्वॉइंट ठरली. यामुळे जनतेत नायडू यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. त्याचा परिणाम या निवडणूक निकालात दिसून आला आहे. चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर पवन कल्याण यांनी त्यांची भेट घेतली यामुळे संपूर्ण राजकीय नेपथ्यच बदलून गेले. जगन मोहन रेड्डी जे काही करत होते ते त्यांच्या विरोधात केले. जगन रेड्डी यांनी अनेक उमेदवारांचे तिकीट कापले ते सर्व वायएसआर सोडून टीडीपीमध्ये गेले व निवडून आले.

चंद्राबाबू नायडू १९९५ ते २००४ पर्यंत संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१४ नंतर आंध्राच्या विभाजनानंतर वेगळ्या आंध्र प्रदेशचे पहले मुख्यमंत्रीही बनले होते. मात्र ५ वर्षापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने सत्ता मिळवली होती. मात्र आता ५ वर्षानंतर टीडीपी पुन्हा सत्तेत येताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीत आंध्रांत TDP १६ जागांवर आघाडीवर आहे तर जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ३ तर पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४