मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrababu naidu : चंद्राबाबूंचं मोठं विधान, म्हणाले “…तर २०२४ ची निवडणूक माझी शेवटची ठरणार”

Chandrababu naidu : चंद्राबाबूंचं मोठं विधान, म्हणाले “…तर २०२४ ची निवडणूक माझी शेवटची ठरणार”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 18, 2022 10:42 PM IST

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी करनूल येथे मोठी घोषणा केली आहे. २०२४ मध्ये जर टीडीपी सत्तेवर आली नाही तर ही निवडणूक आपल्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले आहे.

चंद्राबाबू नायडू
चंद्राबाबू नायडू

अमरावती -तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीमोठं विधान केले आहे.आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की,जर २०२४ च्या निवडणुकीत टीडीपीला विजय मिळाला नाही तर ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. करनूल येथील एका रॅलीलो संबोधित करताना चंद्राबाबूंनी हे विधान केले.

चंद्रबाबू नायडू यांनी भावूक होत म्हटले की, जर मला विधानसभेत जायचे आहे, जर मला राजकारणात राहायचे आहे आणि जर आंध्र प्रदेशसोबत न्याय करायचा आहे. तर तुम्हाला टीडीपीला विजयी करावं लागेल. जर आगामी निवडणुकीत तुम्ही आम्हाला विजयी केलं नाही तर ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक ठरू शकते.

नायडू यांनी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, वायएसआर काँग्रेसने विधानसभेत माझ्या पत्नीचा अपमान केला. तेव्हाच १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मी शपथ घेतली की, सत्तेत आल्यावरच आंध्र प्रदेश विधानसभेत पाय ठेवणार. त्यामुळे जर मी पुन्हा सत्तेत आलो नाही तर पुढील निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग