मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चंडीगडमध्ये AAP चा होणार महापौर, पुन्हा होणार मतमोजणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

चंडीगडमध्ये AAP चा होणार महापौर, पुन्हा होणार मतमोजणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 05:07 PM IST

chandigarh Mayor Election : सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत.

supreme court
supreme court

चंडीगड महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने महापौर निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाशीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मतपत्रिकांची तपासणी केल्यानंतर म्हटले की, ज्या ८ मतांना अवैध घोषित केले होते, ते AAP उमेदवार कुलदीप कुमार यांना पडले होते. अशा पद्धतीने आता चंडीगडमध्ये आम आदमी पक्षाचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने म्हटले की, महापौर निवडणुकीतील मतमोजणी पुन्हा करावी. त्याचबरोबर त्याचबरोबर ती ८ मतेही वैध ठरवली जावीत. 

महापौर निवडणूक प्रकरणी कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. न्यायाशीशांनी  वकील आणि पर्यवेक्षकांना बॅलेट पेपर दाखवत म्हटले की, ज्या ८  बॅलेट पेपर्संना अवैध घोषित केले होते ती सर्व मते कुलदीप कुमार यांना पडली होती. न्यायालयाने म्हटले की, निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी या मतपत्रिकांवर क्रॉस मार्क केले होते. न्यायालयाने त्यांना विचारले की, जर काहीच गडबड नव्हती तर ही मते अवैध घोषित का केली? यावर अनिल मसीह यांच्या वकिलांनी म्हटले की, वोटिंग दरम्यान वातावरण बिघडले होते. त्यामुळे अनिल मसीह यांना वाटले की, हे लोक बॅलेट पेपर्स घेऊन जात आहेत. 

त्यानंतर अनिल मसीह यांनी बॅलेट पेपर्स त्यांच्याकडून हिसकावून घेतले व त्यावर क्रॉसचे निशाण करत ती मते अवैध घोषित केली. या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. महापौर निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जर पुन्हा निवडणूक झाली असती तर भाजपचाच महापौर झाला असता.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने आधी दिलेल्या मतांचीच पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले असून ती ८ मतेही वैध ठरवली आहत. त्यामुळे चंडीगडमध्ये आपचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाआधीच महापौर निवडले गेलेले भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला होता.

WhatsApp channel

विभाग