Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM

Jharkhand Politics : झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM

Jul 03, 2024 08:42 PM IST

Champai Soren resigns : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची तब्बल पाच महिन्यांनंतर २८ जून रोजी तुरुंगातून सुटका झाली होती. आता ते पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे.

चंपई सोरेन यांनी राज्यपालांना राजीनामा सोपवला.
चंपई सोरेन यांनी राज्यपालांना राजीनामा सोपवला. (X/ANI)

झारखंडमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन बुधवारी आपल्या पदाची राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.

राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. हेमंत सोरेन परतल्यानंतर आमच्या आघाडीने हा निर्णय घेतला आणि आम्ही हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड केली. आता मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करण्यापूर्वी हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर झामुमोच्या ६७ वर्षीय नेत्याने २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्याने सुमारे पाच महिन्यांनंतर २८ जून रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सविस्तर काही वेळाने सांगणार आहोत. आम्ही सर्व प्रक्रियांचे पालन केले आहे,' असे हेमंत सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाच महिन्यांनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर हेमंत सोरेन यांनी आपण षडयंत्राला बळी पडल्याचा दावा केला होता.

मला खोट्या पद्धतीने अडकवण्यात आलं. माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले आणि मला पाच महिने तुरुंगात काढावे लागले. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. कोर्टाने आपला आदेश दिला आणि मी जामीनावर बाहेर आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया लांबलचक आहे.

मात्र हेमंत सोरेन मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेणार याची माहिती देण्यात आली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार हेमंत सोरेन ५ जुलै रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.

झारखंडचे राज्यपाल राधाकृष्णन आज सायंकाळीच पडुच्चेरीहून रांचीत पोहोचले होते. चंपाई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथ ग्रहण समारंभातच अन्य काही जण मंत्रीपदाची शपथ घेतील. राजद आमदार सत्यानंद भोक्ता यांनी दावा केला की, ते सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतील.

झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनणार हेमंत सोरेन -

चंपाई सोरेन यांनी झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली होती. झारखंडमध्ये याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणका होणार आहेत. त्याआधी आघाडीतील पक्षांनी व आमदारांनी चंपाई सोरेन यांच्या निवासस्थांनी एक बैठक घेऊन सर्वसहमतीने हेमंत सोरेन यांना झामुमो विधीमंडळ दलाचा नेता निवडण्यात आले.

सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यापूर्वी ईडीने त्यांना अनेकदा समन्स बजावले होते आणि त्यानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर