karnataka crime news : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामनगरा (karnataka ramnagra crime) जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात घडली आहे. एका व्यक्तीच्या फार्म हाऊसवर २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हा व्यक्ति मंत्रतंत्र करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कर्नाटकात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फार्म हाऊसमध्ये २५ मानवी कवटींसह शेकडो हाडे सापडली आहेत. हे पाहून स्थानिक नागरिकांसह अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार, बलराम नावाच्या व्यक्तीने त्यांना गुप्त पूजेसाठी गोळा केले होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे. रामनगर जिल्ह्यातील जोगनहल्ली गावात ही घटना उघडकीस आली आहे.
रविवारी रात्री जोगनहल्ली गावातील बलराम नावाचा व्यक्ती स्मशानभूमीत पूजा करत असताना गावकऱ्यांनी त्याला पाहिले. स्मशानभूमीत बलरामला असे पाहून घाबरलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. स्मशानभूमीत एक व्यक्ती काळी जादू करत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अघोरी पूजा करणाऱ्या बलरामला अटक केली. त्याची चौकशी केली असतं अनेक खळबळजनक घटना समोर आल्या. पोलिसांनी बलरामच्या फार्म हाऊसवर जात तपास सुरू केला.
झडतीदरम्यान पोलिसांना बलराम च्या फार्म हॉउसवर तब्बल २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडले. त्या कवटीवर हळद, कुंकू आणि पांढरे पट्टे लावण्यात आले होते. या कावट्यांचा वापर त्याने अघोरी पूजेसाठी केला असल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. या कवटीचे आणि हाडांचे वय निश्चित करण्यासाठी एफएसएल पथक देखील विशेष चाचण्या करत आहे. बलरामने हाडांची खुर्ची आणि पलंग तयार केल्याने अधिकारीही अवाक् झाले.
पोलिस तपासादरम्यान बलरामने सांगितले की, ही कवटी आणि हाडे त्याच्या पूर्वजांच्या काळातील आहेत, परंतु अधिकाऱ्यांना त्या चार ते पाच वर्षांपूर्वीच्या असल्याचा संशय आहे. या अस्थी त्यांनी स्मशानभूमीतून गोळा केल्याचं समजतं. बलरामने आपल्या जमिनीवर शेड बांधून त्याला 'श्री शमशान संहिता' असे नाव दिल्याचे तपासात उघड झाले आहे. स्मशानभूमीतून कवटी आणि हाडे आणल्याने तो तंत्रमंत्राचा अभ्यास करत होता, असे देखील तपसात पुढे आले आहे.