मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एका खुर्चीने नवदाम्पत्याच्या स्वप्नांचा केला चुराडा; विवाहानंतर काही तासात घटस्फोट, काय आहे प्रकार?

एका खुर्चीने नवदाम्पत्याच्या स्वप्नांचा केला चुराडा; विवाहानंतर काही तासात घटस्फोट, काय आहे प्रकार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 04:57 PM IST

Viral News : एका खुर्चीवरून लग्न मोडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर काही वेळातच घटस्फोट झाला व वऱ्हाडी मंडळींना मोकळ्या हाताने परतावे लागले.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका खुर्चीवरून लग्न मोडले तसेच लग्न मंडपात जोरदार घमासान झाले. वर व वधू पक्षामध्ये हाणामारी होण्यापर्यंत प्रकरण बिघडले. यामुळे काही वेळापूर्वी झालेला निकाह तुटला. नवरदेवाच्या आजीने खुर्ची मागण्यावरून वाद सुरू झाला. नाराज झालेल्या नवरदेव व त्याच्या भावाने नवरीकडील मंडळीना शिवीगाळ केली. यामुळे नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडाला कोंडून ठेवले. लग्नातील भोजनाचा खर्च व तलाक दिल्यानंतर वऱ्हाडी मंडळींना सोडले गेले. 

औरंगाबाद येथील तरुणीचा निकाह दिल्लीतील सीमापुरी येथे राहणाऱ्या तरुणासोबत ठरला होता. शनिवारी रात्री निकाह होणार होता. वऱ्हाडी मंडळीने मोठ्या आनंदात भोजन केले. मौलवीने निकाल लावून दिला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लग्न मंडपात नवरदेवाची आजी खुर्चीवर बसली होती. त्यावेळी एक तरुण तेथे आला व त्याने तिला खुर्चीवरून उठण्यास सांगितले. आजीने या तरुणाला शिव्या दिल्या व स्वत:ला गोळी मारण्याची धमकी दिली.

याची माहिती नवरदेव व त्याच्या भावाला होताच त्यांचा पारा चढला. ते नवरी व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करू लागले. वधुपक्षाने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली, मात्र नवरदेवाने दिल्लीत गेल्यावर नवरीला ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे चिढलेल्या नवरीने नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला. यामुळे वऱ्हाडी मंडळीत खळबळ माजली.

त्यानंतर नवरी मुलीकडील मंडळींनी लग्नाच्या खर्चाची मागणी करत वऱ्हाडींना कोंडून घातले.  त्यांनी मॅरेज हॉलचे दार बंद केले. यानंतर वराकडील मंडळींनी लग्नाचा खर्च दिला व आपल्या घरी परतले. पोलिसांनी सांगितले की, याबाबत पोलिसांना कोणाकडूनही तक्रार प्राप्त झाली नाही.

WhatsApp channel