परदेशी नागरिकांनाही भारतीय तंबाखू गुटख्याचं व्यसन; ब्रिटेनच्या रस्त्यावर पडलेल्या चैनी खैनी पाकीटाचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  परदेशी नागरिकांनाही भारतीय तंबाखू गुटख्याचं व्यसन; ब्रिटेनच्या रस्त्यावर पडलेल्या चैनी खैनी पाकीटाचा व्हिडिओ व्हायरल

परदेशी नागरिकांनाही भारतीय तंबाखू गुटख्याचं व्यसन; ब्रिटेनच्या रस्त्यावर पडलेल्या चैनी खैनी पाकीटाचा व्हिडिओ व्हायरल

Oct 23, 2024 11:22 AM IST

Viral Video : भारतातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि गुटख्याचे व्यसन आहे. मात्र, हे व्यसन आता परदेशी नागरिकांना देखील लागले आहे. ब्रिटेनच्या रस्त्यावर चैनी-खैनीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

परदेशी नागरिकांनाही भारतीय तंबाखू गुटख्याचं व्यसन; ब्रिटेनच्या  रस्त्यावर पडलेल्या चैनी खैनी पाकीटाचा व्हिडिओ व्हायरल
परदेशी नागरिकांनाही भारतीय तंबाखू गुटख्याचं व्यसन; ब्रिटेनच्या रस्त्यावर पडलेल्या चैनी खैनी पाकीटाचा व्हिडिओ व्हायरल (Instagram/@anurag_in_uk)

Viral Video : भारतीय नागरिक तंबाखू गुटख्याचे चांगलेच शौकीन आहेत. तंबाखू गुटख्याचे वेड असलेल्या अनेकांचा व्हिडिओ सोशल मिडियावर या पूर्वी व्हायरल झाले आहेत. तर या भारतीयांच्या या व्यसनांवरून परदेशी नागरिकांनी भारतीयांना ट्रोल देखील केले आहे. मात्र, भारतीयांचे हे वेड आता साता समुद्रापार गेले आहे. परदेशी नागरिकांना देखील तंबाखू गुटख्याचे व्यसन लागले आहे. या बाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. तर स्थानिक नागरिकांनी भारतीय नागरिकांना यावरून कोसलं आहे.

सध्या भारतात स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. या साठी स्वच्छ भारत अभियान देखील राबवले जात आहे. मात्र, काही लोक याकडे दुर्लक्ष करून सार्वजानिक ठिकाणी कचरा करतात. भारतात रस्त्यावर तंबाखू गुटख्याची वापरलेली पाकिटे पडलेली दिसतात. पण, आता परदेशात देखील रस्त्यावर तंबाखू गुटख्याची रिकामे पाकिटे पडलेली दिसतात. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटेनच्या रस्त्यावर ‘चैनी खैनी’ सारखे पाकिटे पडलेली दिसत आहे.

नुकताच अनुराग चौधरी या इन्स्टाग्राम युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले की, 'आपल्या चैनी खैनी खाणाऱ्या मित्राला हा टॅग करा. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, 'भाऊ मी आज यूकेमध्ये फिरत होतो. कोण म्हणतं तुम्हाला युकेमध्ये काहीच मिळत नाही. भारतीयांची तंबाखूची क्रेझ आता परदेशात देखील पासरल्याचं त्यांन व्हिडिओत म्हटलं आहे.

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया २०१६-१७ नुसार तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या २६ कोटींहून अधिक आहे. आता हे व्यसन परदेशातील नागरिकांना देखील जडलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ब्रिटनमध्ये रस्त्याच्या कडेला चैनी खैनीचं पाकीट पडलेलं दिसत होतं. ही पोस्ट पाहून स्थानिक नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

एका युजरने लिहिलं, 'वेगळा देश पण मानसिकता एकच असं लिहिलं आहे. एका युजरने लिहिलं, 'असं घाणेरडं वर्तन निंदनीय आहे'. आणखी एका युजरने लिहिले की, 'भारतीय असण्याची ही जादू आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “भावा उचलले होते पाकिट तर डस्टबिनमध्ये टाकायचे.” तर एका युजरने लिहिलेय, “वेगळा देश पण मानसिकता सारखीच आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारतीयांची काळी बाजू”. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये कोणत्याही ठिकाणी घाण पसरविणे हा पर्यावरण संरक्षण कायदा १९९० अंतर्गत गुन्हा मानला जातो. दोषी आढळल्यास दंडही ठोठावला जातो.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर