Viral news : अमेरिकेतील एका म्युझिकल इंस्ट्रुमेंट कंपनीच्या सीईओने राग आला म्हणूंन ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. या बाबत कंपनीच्या एका इंटर्नने सीईओच्या निर्णयाबद्दल रेडिटवर पोस्ट केली आहे. सीईओला राग आल्याने त्याने ९९ जणांना कामावरून काढून टाकले. रेडिटवर एका युझर्सने दावा केला की तो इंटर्न म्हणून संगीत वाद्य खरेदीसाठी बाजारात गेला होता. मात्र, तासाभरातच त्याला कामावरून काढून टाकण्याचा मेल आला. थोड्या वेळात कंपनीच्या १११ कर्मचाऱ्यांपैकी ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याच त्याला कळले. मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून तो गंभीर नसल्याची त्याच्यावर टीका झाली होती.
कंपनीच्या सीईओने एक बैठक बोलावली होती. या बैठीकीत अनेक कर्मचारी हे गैराजर राहिले. त्यांनी ही बैठक गांभीर्याने घेतली नाही. यामुळे संतापलेल्या कंपनीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याने तब्बल ९९ जणांना कामावरून काढून टाकले. कर्मचारी बैठकीला न आल्याने नाराज झालेल्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना निरोप पाठवला, 'तुम्हा सर्वांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तुमच्यापैकी जे आज सकाळी बैठकीला आले नाहीत, त्यांना कामावरून काढल्याची ही अधिकृत नोटीस समजा. तुम्ही कंपनी रुजू करतांना जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यास तुम्ही असमर्थ ठरला आहात. तुम्ही कारारातील तरतुदी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आणि आपण ज्या बैठकांना उपस्थित राहणे आणि काम करणे अपेक्षित होते ते करण्यास देखील तुम्ही अपयशी ठरला.
संतापलेल्या सीईओंनी आपल्या कर्मचार् यांना सूचना केली, "मी कंपनी आणि कर्मचारी यांच्यात झालेले सर्व करार रद्द करत आहे. कृपया तुमच्याकडे कंपनीच्या ज्या काही वस्तु आहेत त्या परत करा. तसेच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया खात्यातून बाहेर पडा. या सोबतच स्वत: ला कंपनीच्या स्लॅकमधून देखील काढून टाका. मी तुम्हाला तुमचं आयुष्य सुधारण्याची, व अधिक मेहनत करण्याची आणि भविष्यात प्रगती करण्याची संधी दिली. तरीही तुम्ही ती गांभीर्याने घेतली नाही, हे तुम्ही सिद्ध केले आहे. आज सकाळी १११ जणांपैकी केवळ ११ जण बैठकीला उपस्थित होते. ते ११ वगळता बाकीच्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे."