मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चमत्कार! कृष्णा नदीकिनारी मिळाली पुराणकालीन विष्णूची मूर्ती, रामलल्ला सारखी दिसते हुबेहूब

चमत्कार! कृष्णा नदीकिनारी मिळाली पुराणकालीन विष्णूची मूर्ती, रामलल्ला सारखी दिसते हुबेहूब

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 07, 2024 08:32 PM IST

Vishnu Idol : कर्नाटक राज्यातीलरायचूर जिल्ह्यातील एका गावातकृष्णा नदीच्या किनारी भगवान विष्णूचीएक प्राचीन मूर्ती मिळाली आहे.

Vishnu Idol
Vishnu Idol

तेलंगाणाच्या सीमेवर कर्नाटकमध्ये शिवलिंग आणि भगवान विष्णूची मूर्ती मिळाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मूर्ती पुराणकालीन आहेत. कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या किनारी भगवान विष्णूची एक प्राचीन मूर्ती मिळाली आहे. मूर्तीच्या चारी बाजुंनी दशावतार कोरण्यात आले आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशेष म्हणजे ही मूर्ती अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीशी मिळती-जुळती आहे. विष्णू मूर्ती उभारलेल्या स्थितीत आहे. त्याच्या चारी बाजुंनी एक आभामंडल असून त्यावर १० अवतारांचे दर्शन आहे. त्याचबरोबर मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंग मिळाले आहे. 

रायचूर विद्यापीठात प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाचे प्राध्यापक डॉ. पद्मजा देसाई यांनी विष्णू मूर्तीबद्दल सांगितले की, ही मूर्ती एकाद्या मंदिरातील गर्भगृहात विराजमान होती. मंदिराची तोडफोड केल्यानंतर मूर्ती नदीत फेकल्याची शक्यता आहे. 

असे मानले जाते की, ही मूर्ती १ हजार वर्ष पुरानी आहे. पुरातत्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही मूर्ती इसवी सन ११ व्या किंवा १२ व्या शताब्दीतील आहे. विष्णू मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या ताब्यात आहेत.

WhatsApp channel

विभाग