Coronavirus In India : देशात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात पहिला JN1 या कोरोनाच्या व्हेरिअंट आढळला असून त्यामुळे चिंता वाढली आहे. या नव्या विषाणूमुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचे आणि उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच केंद्राने राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.
देशात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशातील जे.एन. १ या विषणूने बाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सतर्क राहण्याच्या आणि उपाय योजना करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. केंद्राने विविध राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत, केंद्राने म्हटले आहे की राज्यांनी कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे. याशिवाय जिल्हा स्तरावर येणाऱ्या SARI आणि ILI प्रकरणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यांना RT-PCR चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आढळलेले पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी INSACOG लॅबमध्ये पाठवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत देशात एकूण ३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय यूपी आणि केरळमध्येही कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील वाढती रुग्णसंख्या पाहता कर्नाटकमध्ये विशेष अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. येथील आरोग्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मास्क घालण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
देशात तसेच जगभरात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचे कारण बनले आहे. सिंगापूरमध्ये गेल्या दोन आठवड्यात जवळपास ६० हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओनेही याबाबत इशारा दिला आहे. कोरोनाचा नवा विषाणू जेएन १ हा घातक असून चिंतेचे खरे कारण आहे. या नवीन प्रकारामुळे अमेरिका आणि चीनमधील काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
चींन आणि अमेरिकेत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनली आहे. या दोन्ही देशांमध्ये जे.एन. विषाणूने बाधित रुग्ण आढळले आहे. कोरोनोचा हा विषाणू जवळपास ४० देशांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे २०० टक्क्यांनी वाढली आहेत.
संबंधित बातम्या