मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

May 18, 2024 09:38 PM IST

8th Pay Commission : महागाई दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा५०टक्के दराने डीए मिळत आहे. यामध्ये१जुलैपासून४टक्क्यांनी वाढ होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी  सरकारने (Central government employee) मोठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर ५४ टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना  ५० टक्के दराने महागाई भत्ता (DA) मिळत आहे. महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर सरकार ८ व्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल, असा नियम आहे. मात्र अजूनपर्यंत याबाबत कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

महागाई दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ५० टक्के दराने डीए मिळत आहे. यामध्ये १ जुलैपासून ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. जानेवारी २०२४ पासून ३० जून २०२४ चा चार्टनुसार डीए किमान ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी व्यक्त केली आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर कोणता विचार केला नाही. सरकारकडे असा कोणता प्रस्तावदेखील विचारधीन नाही. भारत पेन्शनर समाज (बीपीएस) ने ८ व्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती. त्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यांमध्ये संशोधनाला मंजुरी दिली होती. 

आठव्या वेतन आयोगाच्या (8th pay commission Update) समितीसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारला सूचना पाठवण्यात येत आहेत, असे बीपीएसचे महासचिव एससी महेश्वरी यांनी सांगितले होते. ६८ व्या एजीएमदरम्यान आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करावी, असा एक प्रस्ताव संमत करण्यात आला. 

आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी -

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन म्हणजेच आयआरटीएसएसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मागणी केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारसमोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल, असे  स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी सांगितले. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग