मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Upendra Dwivedi: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे लष्करप्रमुख

Upendra Dwivedi: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे लष्करप्रमुख

Jun 11, 2024 11:37 PM IST

Lt Gen Upendra Dwivedi : १९८४ मध्ये इन्फंट्री (जम्मू-काश्मीर रायफल्स) मध्ये कमिशन झालेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी अनेक कमांड आणि स्टाफ च्या भूमिका पार पाडल्या आहेत. आता नवे लष्करप्रमुख म्हणून ते ३० जून रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

.लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
.लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी ( lieutenant general Upendra Dwivedi ) यांची लष्करप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी ३० जून रोजी जनरल मनोज पांडे यांच्या जागी नवीन पदभार स्वीकारतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवण्यात आला होता. आता ते  ३० जून रोजी निवृत्त होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत असून ते जनरल पांडे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी आणि लेफ्टनंट जनरल सिंग हे दोघेही कोर्स मेट आहेत.

या पदांवर सेवा भूषवली -

१ जुलै १९६४ रोजी जन्म झालेले उपेंद्र द्विवेदी यांना डिसेंबर १९८४ मध्ये लष्करी इन्फँट्री (जम्मू आणि काश्मीर रायफल्स) मध्ये कमीशन मिळाले होते. सुमारे चार दशकांच्या त्यांच्या लष्करी कारकीर्दीत अनेक प्रतिष्ठित कमांड, स्टाफ, इन्स्ट्रक्शनल आणि फॉरेन नेमणुका झाल्या आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्या उल्लेखनीय कमांड भूमिकांमध्ये १८ जम्मू-काश्मीर रायफल्स रेजिमेंट,२६ सेक्टर आसाम रायफल्स ब्रिगेडचे नेतृत्व, आसाम रायफल्स (पूर्व) चे उपमहानिरीक्षक म्हणून काम करणे आणि ९ कॉर्प्सचे नेतृत्व आदिचा यांचा समावेश आहे.

लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी २०२२ ते२०२४ या कालावधीत महासंचालक इन्फंट्री आणि जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ (मुख्यालय उत्तर कमांड) अशी महत्त्वपूर्ण पदे भूषविली.

सैनिक स्कूल रीवा, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेज सारख्या प्रतिष्ठित संस्थांचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. डिफेन्स अँड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमफिल आणि स्ट्रॅटेजिक स्टडीज अँड मिलिटरी सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी यांचा समावेश आहे. अमेरिकेतील कार्लिस्ले येथील यूएसएडब्ल्यूसी येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या समकक्ष अभ्यासक्रमात त्यांना 'डिस्टिंग्विशफाइड फेलो' म्हणून गौरविण्यात आले.

लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्या अनुकरणीय सेवेला परम विशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम), अति विशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि तीन जीओसी-इन-सी प्रशस्तीपत्रांसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४