Bank Jobs 2024: बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सफाई कर्मचाऱ्यांसह विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ९ जानेवारी २०२४ अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार त्वरीत त्वरित ऑनलाइनद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
या भरतीमध्ये सामील होण्यास पात्र असलेले सर्व उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट Centralbankofindia.co.in वर भेट देऊ शकतात. कोणताही विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आज मध्यरात्री १२ नंतर अर्जाची विंडो बंद होईल.
उमेदवाराचे वय १८- २६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२३ रोजी वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना जास्तीच्या वयोमर्यादेत वयात सवलत दिली जाईल. अर्जाचे शुल्क सर्वसाधारण /ओबीसी/ इडब्लूएस श्रेणीसाठी रुपये ८५० आणि एससी/एसटी श्रेणीसाठी रुपये १७५ रुपये अर्ज शुल्क ठरवण्यात आले.