Central bank recruitment : सेंट्रल बँकेत २६६ ऑफिसर पदांची भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Central bank recruitment : सेंट्रल बँकेत २६६ ऑफिसर पदांची भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज?

Central bank recruitment : सेंट्रल बँकेत २६६ ऑफिसर पदांची भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज?

Jan 21, 2025 01:47 PM IST

Central Bank Officer Recruitment News : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये २६६ ऑफिसर पदांची भरती होणार असून त्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

Central bank recruitment : सेंट्रल बँकेत २६६ ऑफिसर पदांची भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज?
Central bank recruitment : सेंट्रल बँकेत २६६ ऑफिसर पदांची भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज?

Central Bank Recruitment 2025 : बँकेत मोठ्या पदाची नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये २६६ झोन बेस्ड ऑफिसर पदांची भरती होणार असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार बँकेच्या centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज नोंदणी प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू होणार असून ती ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालेल. ऑनलाइन परीक्षा मार्च २०२५ मध्ये होणार आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

रिक्त जागांची संख्या आणि तपशील

अहमदाबाद : १२३ पदे

चेन्नई : ५८ पदे

गुवाहाटी: ४३ पदे

हैदराबाद : ४२ पदे

पात्रतेचे निकष

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकात्मिक दुहेरी पदवी (आयडीडी) सह केंद्र सरकारनं मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता. मेडिकल, इंजिनीअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट अशी पात्रता असलेले उमेदवारही पात्र असतील. 

वयोमर्यादा

उमेदवारांचं वय २१ ते ३२ दरम्यान असावं. म्हणजेच उमेदवारांचा जन्म ३०.११.२००३ च्या नंतर आणि ०१.१२.१९९२ च्या आधी (दोन्ही दिवसांचा समावेश) झालेला नसावा.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश असेल. लेखी परीक्षा १२० प्रश्न आणि १२० गुणांची असेल. परीक्षेचा कालावधी ८० मिनिटांचा आहे. सामायिक लेखी परीक्षेचे : मुलाखतीला ७०:३० (लागू झाल्याप्रमाणे) या प्रमाणात वेटेज असेल. ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे झोननिहाय आणि प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज शुल्क

अनुसूचित जाती/जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये +जीएसटी आणि इतर सर्व उमेदवारांसाठी ८५० + जीएसटी आहे. डेबिट कार्ड (रुपे / व्हिसा / मास्टरकार्ड / मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरुन स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट केले जाऊ शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर