बापरे.. वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी, स्वत:चीही आहेत ५ मुले; मात्र हे झाले कसे?-celebrity became grandmother at the age of 34 people are asking questions on the internet ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बापरे.. वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी, स्वत:चीही आहेत ५ मुले; मात्र हे झाले कसे?

बापरे.. वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी, स्वत:चीही आहेत ५ मुले; मात्र हे झाले कसे?

May 15, 2024 04:14 PM IST

Viral News : ३५ वर्षीयशर्ली लिंग यांचा १७ वर्षीय मुलगा एका वर्षापूर्वी बाप बनला आहे. त्यामुळे तीही कमी वयात आजी बनली आहे.

वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी
वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी

Viral News : सिंगापूरमधील एक सेलिब्रिटी वयाच्या ३४ व्या वर्षीच आजी (Celebrity  became grandmother ) बनली आहे. त्यानंतर कमी वयात आई बनल्यामुळे महिलेच्या शरीरावर होणारे परिणामांची चर्चा होऊ लागली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार ३५ वर्षीय शर्ली लिंग यांचा १७ वर्षीय मुलगा एका वर्षापूर्वी बाप बनला आहे. त्यामुळे तीही कमी वयात आजी बनली आहे. तिने आपल्या पहिल्या नातवाचे कुटूंबात स्वागत केले आहे. शर्ली लिंग एका चिकन हॉटपॉट दुकानाची मालकीन आहे. तिने तीन लग्ने केली असून तिला ५ मुले आहेत. 

शर्लीला वयाच्या १७ व्या वर्षीच मुलगा झाला होता. त्यानंतर आणखी एक मुलगा  व तीन मुली झाल्या. सध्या तिचा सर्वात मोठा मुलगा १८ वर्षाचा आहे. अन्य मुले १७, १३, १० आणि ८ वर्षाची आहेत.

शर्ली लिंगचे इन्स्टाग्रामवर १७,००० फॉलोअर्स आहेत. ती २०२२ मध्ये सिंगापूच्या सैन्य कॉमेडी आह गर्ल्स गो आर्मी मध्ये दिसल्यानंतर आपल्या आकर्षक वैशिष्यामुळे लोकप्रिय झाली. लिंग हिने एससीएमपीला सांगितले की, जेव्हा मुले मोठे होत आहेत तेव्हा त्यांना सांगितले गेले पाहिजे कि, मम्मी सारखे होऊ नका. इतक्या कमी वयात लग्न करू नका. मात्र तुम्ही जितके त्यांना असे करू नका म्हणाल तितके ते तसेच करत असतात. 

मागच्या वर्षी तिच्या मोठ्या मुलाची प्रेयसी गर्भवती झाली तेव्हा लिंगला राग आला होता. तिने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिने खोचक टिप्पणी करत म्हटले की, मुलाला १७ व्या वर्षीच बाप बनण्यासाठी प्रेरित केले होते.

शर्ली लिंग हिने म्हटले की, जे घडले ते घडले, ते काही बदलू शकत नाही. तिने म्हटले की, मुलाला रागावण्याऐवजी सल्ला व त्याचे समर्थन करणार आहे. तिने म्हटले की, मोठा मुलगा अधिक चंचल आणि जिज्ञासू आहे.

 

विभाग