मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शेतात लावले CCTV, वॉचमन.. शेतकरी बंदूक घेऊन रात्रंदिवस करत आहेत ‘या’ पिकाची राखण, कारण काय?

शेतात लावले CCTV, वॉचमन.. शेतकरी बंदूक घेऊन रात्रंदिवस करत आहेत ‘या’ पिकाची राखण, कारण काय?

Feb 23, 2024 05:03 PM IST

Garlic Rate hike : लसणाच्या चोरीच्या भीतीने उज्जैनमधील शेतकऱ्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेऱे लावले आहेत. त्याचबरोबर चौकीदार तैनात केला असून स्वत:ही बंदूक घेऊन राखणदारी करत आहेत.

farmers are guarding crops with guns due to fear of garlic theft 
farmers are guarding crops with guns due to fear of garlic theft 

लसणाच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. लसणाचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतातून लसूण चोरीच्या घटना वाढल्या आहेत. उज्जैन (Ujjain) मधील कलालिया गावात लसणाची चोरी झाल्यानंतर मंगरोला गावातील शेतकरीही लसूण चोरीच्या भीतीपोटी बंदूक घेऊन शेताची राखण करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतात CCTV कॅमेरेही लावले आहेत. त्यामुळे २४ तास पिकावर नजर ठेवली जात आहे. 

काही दिवसापूर्वी उज्जैनमधील खाचरोद तालुक्यातील कलालिया गावात राहणाऱ्या  संजय शाह यांच्या शेतातून लसणाची चोरी झाली होती. संजय शाह सकाळी जेव्हा शेतात गेले तेव्हा त्यांना दिसले की, शेतातीर सर्व लसूण चोरी झाला आहे. त्याचबरोबर अन्य शेतांतूनही लसणाची चोरी झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

चोरीच्या भीतीने उज्जैनमधील मंगरोला गावातील शेतकरी जीवन सिंह आणि भरत सिंह यांनी शेतात सीसीटीव्ही लावले आहेत. शेताच्या राखणीसाठी कुत्रे सोडली आहेत. चौकीदार तैनात केला आहे. त्याचबरोबर स्वत: बंदूक घेऊन शेतातील लसणाची राखण करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शेतकरी जीवन सिंह यांनी सांगितले की, बियाण्यांचे दर वाढल्याने तसेच हवामानामुळे लसणाच्या उत्पादनात घट झाली हे. याकारणामुळे बाजारात लसणाची आवक कमी होऊन दर वाढले आहेत. ओला लसूण १५  हजार रुपये क्विंटल आणि सुखलेला लसूण ४० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. 

उज्जैनमध्ये १०००  हेक्टर क्षेत्रात लसणाचे उत्पादन घेतले जाते. बडनगर, नागदा, खाचरौद, घट्टिया तालुके लसूण पिकासाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षी १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले होते. यावेळी ४ पट अधिक दर मिळत आहे.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर