bengaluru pg murder : प्रेयसीला दूर करून तिला पीजीमध्ये नेण्यास कारणीभूत ठरल्याने संतापलेल्या प्रियकराने एका तरुणीला तिच्या घरी जाऊन तिला बाहेर ओढून तिचा धारधार चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी मदतीसाठी ओरडत राहिली. पण कुणीही तिच्या मदतीसाठी धावले नाही. आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसिटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कृती कुमारी (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मुळची बिहार येथील रहिवासी आहे. ती बेंगळुरूमध्ये एका कंपनीत काम करत होती. तर अभिषेक असे आरोपीचे नाव होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या प्रकरणात महिलेच्या मैत्रिणीचा काही हात आहे का याचा देखील पोलिस तपास करत आहेत.
कृती कुमारीची बेंगळुरू येथील तिच्या पीजीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिस तपास करत असतांना त्यांना या खुनाच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या सीसीटीव्हीत एक व्यक्ती पॉलिथिन बॅग घेऊन 'पेइंग गेस्ट' रूममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्याने कृती कुमारी राहत असलेल्या पीजीचा दरवाजा वाजवला. किर्तीने दरवाजा उघडला असता, त्याने तिचे केस ओढून तिला बाहेर काढले व तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. कीर्तीचा आवाज ऐकून इमारतीतील इतर मुली देखील बाहेर आल्या. मात्र, कीर्तीला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. खुनाची ही घटना रात्री ११.१० ते ११.३० च्या दरम्यान घडली. फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळावरून पळतानाही दिसत आहेत.
बिहारमधील कृती कुमारी हीचा मंगळवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथील तिच्या पीजीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कृती कुमारी ही बिहारची असून ती शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
अभिषेक असे आरोपीचे नाव आहे. त्याने अलीकडेच बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती. तो क्रिती कुमारीच्या रूममेटचा प्रियकर होता. अभिषेक व त्याच्या मैत्रिणीचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे अभिषेकची प्रेयसी क्रिती कुमारीच्या सांगण्यावरून ही पीजीमध्ये राहायला गेली होती. क्रिती कुमारीमुळे त्याची मैत्रीण त्याच्या पासून दुरावल्याचा संशय त्याला होता. याचा राग असल्याने त्याने तिला मारण्याचे ठरवले. क्रिती कुमारी देखील अलीकडेच कोरमंगला येथील व्हीआर लेआउट पीजीमध्ये राहायला आली होती. कोरमंगळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. आरोपी अभिषेकला मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रणन गुप्ता यांनी गुन्हा दाखल केला असल्याचे संगितले.
संबंधित बातम्या