- सीबीएसईने नव्या अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील काही धड्यांचा समावेश आहे.
CBSE New Syllabus: सीबीएसईने २०२२-२३ या वर्षासाठी नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. नवा अभ्यासक्रम सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाकाळात सीबीएसईने दोन टर्मची योजना सुरू केली होती. आता पुन्हा एकदा आधीप्रमाणे एकाच टर्मची योजना सीबीएसईने लागू केली आहे. विद्यार्थ्यांना आता फक्त एकदाच बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल.
ट्रेंडिंग न्यूज
सीबीएसईने नव्या अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील काही धड्यांचा समावेश आहे. अलिप्ततावादी चळवळ, औद्योगिक क्रांती, शीतयुद्ध काळ, मुघल राजवटीचा इतिहास, आफ्रिका-आशिया खंडातील मुस्लिम राजवटीचा उदय यावरील धडे वगळण्यात आले आहेत. दहावीच्या पुस्तकात एका प्रकरणात जात, धर्म आणि लिंग या संदर्भात उदाहऱण म्हणून दिलेली फैज अहमद फैज यांची कविता अभ्यासक्रमातून काढली आहे. यंदाच्या वर्षी अभ्यासक्रमातून ९ वी ते १२ वी च्या काही विषयातील अभ्यासक्रमात बदल केला आहे.
अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेल्या इस्लामचा उदय आणि बारावीच्या पुस्तकातील मुघल साम्राज्यासंदर्भातील धडे वगळण्यात आले आहे. तसंच जागतिक इतिहास या ११ वीच्या पुस्तकातून सेंट्रल इस्लामिक लँडच्या धड्यातील इस्लामचा उदय, विकास आणि इस्लामच्या प्रसाराची माहिती काढून टाकण्यात आली आहे. भारत पाक फाळणीसंदर्भातील काही कथाही अभ्यासक्रमातून वगळल्या आहेत. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीची कारणे, परिणाम आणि साम्राज्यवादाचा प्रचार कसा झाला हा भाग काढून टाकण्यात आला आहे.
नववी इयत्तेच्या कविता विभागात चंद्रकांत देवतळे यांनी लिहिलेला मजकूर काढण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. बारावीच्या वर्गातून हिदीतील मीठाचा मजकूर काढला आहे. देशात संपूर्ण देशात हा अभ्यासक्रम लागू केला आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून वगळण्यात आलेले धडे शिकवले जाणार नाहीत असंही सीबीएसई शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
संबंधित बातम्या