मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CBSE Exam pattern : मोठी बातमी! सीबीएसईने ११ वी, १२वीच्या परीक्षेत केले मोठे बदल, वाचा तपशील

CBSE Exam pattern : मोठी बातमी! सीबीएसईने ११ वी, १२वीच्या परीक्षेत केले मोठे बदल, वाचा तपशील

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 05, 2024 09:29 AM IST

CBSE Exam pattern changes : सीबीएससीने ११ वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या (cbse latest updates) पद्धतीत बदल केले आहे. या पुढे एकापेक्षा जास्त पसंतीचे प्रश्न (MCQ), चालू घडामोडींवर आधारित प्रश्न यात बदल केले आहे.

सीबीएसईने ११ वी, १२वीच्या परीक्षेचे केले मोठे बदल, वाचा तपशील
सीबीएसईने ११ वी, १२वीच्या परीक्षेचे केले मोठे बदल, वाचा तपशील

CBSE Exam pattern changes : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या स्वरुपात बदल जाहीर केला आहे. ही नवे बदल येणारे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून लागू होणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की ११ वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या स्वरूपांतर्गत, सीबीएसई दीर्घ प्रश्न उत्तरांऐवजी, संकल्पनावर आधारित प्रश्न उत्तरावर आता लक्ष केंद्रित करणार आहे. या संकल्पना वास्तविक जीवनात विद्यार्थ्यांना कितपत समजतात याचा शोध घेणे हा या मागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahalakshmi mandir kolhapur : अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीला तडे! तातडीने संवर्धन करणे गरजेचे असल्याचा अहवाल

सीबीएसईच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मल्टीपल चॉइस प्रश्न (MCQ), केस-आधारित प्रश्न, स्त्रोत-आधारित एकात्मिक प्रश्न किंवा संकल्पना अनुप्रयोग प्रश्नांची टक्केवारी ४० वरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवन्यात आली आहे. तर लहान आणि दीर्घ उत्तरांसह इतर प्रश्नांची टक्केवारी ही ४० वरून ३० टक्क्यांवर आली आहे. हे पाऊल विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत बदल घडवून आणेल पाठांतर करण्या ऐवजी त्यांना विविध संकल्पना अधिकाधिक समजून घेण्याच्या दिशेने हे नवे बदल मदत करणार आहेत.

सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युएल म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार, मंडळाने शाळांमध्ये कार्यक्षमतेवर आधारित शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत, ज्यामध्ये कार्यक्षमतेवर आधारित मूल्यांकन आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काही विशेष शैक्षणिक साहित्य तयार करण्यात येणार आहे.

delhi high court : वारंवार पतीचे घर सोडून माहेरी जाणे म्हणजे क्रूरता! कोर्टाने पत्नीला फटकारत घटस्फोट केला मंजूर

ते म्हणाले की, मंडळ प्रामुख्याने अशी शैक्षणिक प्रणाली तयार करण्यावर भर देत आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांचा विकास करणे हा आहे. पाठांतरा ऐवजी शिकण्यावर ही नवी शिक्षण प्रणाली भर देते, जेणेकरून ते २१ व्या शतकातील आव्हानांना विद्यार्थी खऱ्या अर्थाने सामोरे जाऊ शकतील. इयत्ता ९ वी आणि १०वीच्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे इमॅन्युएल म्हणाले.

१०वी १२वी च्या विद्यार्थांना अतिरिक्त भाषा विषय

या सोबतच आता १० वीच्या विद्यार्थ्यांना २ ऐवजी ३ भाषांचा अभ्यास देखील करावा लागणार आहे. यात २ स्थानिक व एका परिकीय भाषेचा समावेश राहणार आहे. दहावीमध्ये सात विषय जोडण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे. या मध्ये सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि कंप्यूटेशन थिंकिंग, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. ३ भाषा, गणित आणि संगणकीय विचारसरणी, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. तर ३ विषयांचे मुल्यांकन अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केले जाणार आहे. या सर्व १० विषयांत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यानंतर त्यांना ११ वी मध्ये प्रवेश घेता येणार आहे.

IPL_Entry_Point