CBSE Admit Card 2025: सीबीएसई बोर्डच्या दहावी, बारावीचं हॉलतिकीट आलं, असं करा डाऊनलोड!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CBSE Admit Card 2025: सीबीएसई बोर्डच्या दहावी, बारावीचं हॉलतिकीट आलं, असं करा डाऊनलोड!

CBSE Admit Card 2025: सीबीएसई बोर्डच्या दहावी, बारावीचं हॉलतिकीट आलं, असं करा डाऊनलोड!

Feb 03, 2025 05:10 PM IST

CBSE 10th, 12th Admit Card: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आले आहे.

सीबीएससी बोर्डच्या दहावी, बारावीचं हॉलतिकीट आलं
सीबीएससी बोर्डच्या दहावी, बारावीचं हॉलतिकीट आलं (Official website, screenshot)

CBSE News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे हॉल तिकिटे परीक्षा संगम पोर्टलवर जाहीर करण्यात केली आहेत. शाळा बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन cbse.gov.in करू शकतात. परीक्षेला बसलेले विद्यार्थी संगम पोर्टलवर लॉग इन करून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, हॉलतिकीट फक्त शाळेच्या लॉगिनद्वारेच उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार नाही.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची अंतिम परीक्षा १८ मार्चला तर बारावीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी १०.३० वाजता होणार आहेत.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी देश-विदेशातील आठ हजार शाळांमधील सुमारे ४४ लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत. बोर्डाने नुकतीच परीक्षा नैतिकतेविषयी अधिसूचना जारी केली आहे, ज्यात ड्रेस कोड, परीक्षा हॉलमध्ये परवानगी आणि बंदी घालण्यात आलेल्या वस्तू, अनुचित साधन पद्धती (यूएफएम) आणि दंड यांचा उल्लेख आहे.

हॉलतिकीट कसे डाऊनलोड करायचे?

- सर्वप्रथम, cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.

- होम पेजवर दिलेल्या अ‍ॅडमीट कार्ड्स लिंकवर क्लिक करा.

- युजर आयडी, पासवर्ड टाका.

- हॉलतिकीट डाऊनलोड करा.

- आता तुमच्या हॉलतिकीटची प्रिंट काढा.

 

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा केंद्रात कोणत्या गोष्टींना परवानगी

  • नियमित विद्यार्थ्यांसाठी: प्रवेशपत्र आणि शाळेचे ओळखपत्र
  • खाजगी उमेदवारांसाठी: प्रवेशपत्र आणि सरकारने जारी केलेले कोणतेही छायाचित्र ओळखपत्र
  • स्टेशनरी: पारदर्शक पाऊच, भूमिती/पेन्सिल बॉक्स, निळा/शाही निळा शाई/बॉलपॉईंट/जेल पेन, स्केल, रायटिंग पॅड, इरेजर.
  • अ‍ॅनालॉग घड्याळ, पारदर्शक पाण्याची बाटली.
  • मेट्रो कार्ड, बस पास आणि पैसे

परीक्षा हॉलमध्ये कोणत्या गोष्टींना सक्त मनाई आहे?

  • स्टेशनरी वस्तू: पाठ्यसाहित्य (मुद्रित किंवा लेखी), कागदाचे तुकडे, कॅल्क्युलेटर, पेनड्राइव्ह, लॉग टेबल (केंद्रांद्वारे प्रदान केले जाईल), इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर इ. डिस्कॅल्क्युलिया असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राने प्रदान केलेले कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे.
  • कम्युनिकेशन डिव्हाइस: मोबाईल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, स्मार्ट वॉच, कॅमेरा इ.
  • इतर वस्तू: पाकीट, गॉगल्स, हँडबॅग्ज, पाऊच इत्यादी.
  • मधुमेही विद्यार्थी वगळता कोणतीही खाण्यायोग्य वस्तू (उघडलेली किंवा पॅक केलेली).
  • इतर कोणत्याही वस्तू ज्या चुकीच्या मार्गाने वापरल्या जाऊ शकतात.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या ड्रेसकोडनुसार नियमित विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश परिधान करावा लागतो. तर. खासगी विद्यार्थ्यांना हलके कपडे परिधान करता येतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर