CBSE 12th result 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी ०.६५ टक्क्यांनी वाढली आहे. ९१ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या तुलनेत हा आकडा ६.४० टक्क्यांनी जास्त आहे. मुलांचा निकाल ८५.१२ टक्के लागला आहे. ९९.९१ टक्के निकालासह त्रिवेंद्रम अव्वल तर विजयवाडा ९९.०४ टक्के निकालासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सीबीएसईच्या cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा
होम पेजवरील परीक्षा / बोर्ड निकाल २०२४ च्या लिंकवर क्लिक करा
इयत्ता १० वी किंवा १२ वी बोर्ड निकाल २०२४ साठी इच्छित लिंकवर क्लिक करा
एक नवीन विंडो उघडेल! तिथं रोल नंबर, स्कूल नंबर आणि सिक्युरिटी पिन सारख्या आवश्यक क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा
सबमिटवर क्लिक करा
सीबीएसई इयत्ता १० वी किंवा १२ वीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
आपल्या डिजिलॉकर अॅपवर लॉग इन करा किंवा खाते तयार करा
सीबीएसई निकाल २०२४ पर्यायावर क्लिक करा
सीबीएसई इयत्ता १२ वी किंवा १० वी निकाल २०२४ अॅक्टिव्ह लिंकवर क्लिक करा
आधार क्रमांक प्रविष्ट करा
सबमिटवर क्लिक करा
तुमचं स्कोअरकार्ड मोबाइल स्क्रीनवर दिसेल.
सीबीएसईनं ११ मे रोजी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२४ साठी गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सीबीएसईनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नाहीत, ते दिलेल्या वेळापत्रकात गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपीसाठी अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीनं कोणतीही विनंती बोर्डाद्वारे स्वीकारली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
सीबीएसईच्या परिपत्रकानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून विद्यार्थी गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. निकाल जाहीर झाल्यापासून आठव्या दिवसापर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. ही सुविधा केवळ पाच दिवसांसाठी मिळणार आहे.
तसंच, उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर होण्याच्या २४ व्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे. ही सुविधाही केवळ दोन दिवसांसाठी मिळणार आहे. निकाल जाहीर झाल्याच्या २५ व्या दिवसाच्या अखेरीस ही सुविधा बंद होईल.