मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Satyapal Mailk : मोदी सरकारविरोधात बोलणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

Satyapal Mailk : मोदी सरकारविरोधात बोलणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 22, 2024 12:26 PM IST

cbi raids satyapal malik house : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली आहे. तब्बल ३० ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

Satyapal Malik on PM Modi
Satyapal Malik on PM Modi

cbi raids satyapal malik house : शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापे टाकले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाता झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआयने एकूण ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी तपासासंदर्भात सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्याघरावर छापेमारी केली आहे. दरम्यान, सत्यपाल मलिक यांनीच या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

nps news : एनपीएसचं खातं उघडलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

२०१९ मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार २०० कोटी रुपयांच्या नागरी कामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने डिसेंबरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. यात कंपनीशी संबंधित कंवलजीत सिंग दुग्गल आणि डीपी सिंग यांचाही समावेश आहे, त्यांच्याही घरावर छापे टाकण्यात आले आहेत. सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत आरोप केला होता की, या प्रकल्पा संदर्भात दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना २०० कोटींची ऑफरही देण्यात आली होती, पण त्यांनी ती फेटाळली होती.

PM kisan : प्रतीक्षा संपली! २८ फेब्रुवारीला बँक खात्यात येणार पीएम किसान योजनेचे पैसे, असं चेक करा तुमचं नाव

सत्यपाल मलिक हे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. यादरम्यान या प्रकल्पाची फाईल त्यांच्याकडे आली होती. ही फाइल मंजूर करण्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीनकुमार चौधरी, माजी अधिकारी एम.एस. बाबू, एमके मित्तल आणि अरुणकुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित काही गोष्टींसाठी सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर छापेमारी केली आहे. सीबीआय एप्रिल २०२२ पासून या प्रकरणाचा तपास करत आहे. किरू प्रकल्प किश्तवाडपासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे. २० एप्रिल २०२२ रोजी जम्मू-काश्मीर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे करण्याची मागणी केली होती. या प्रकल्पाचे कंत्राट देताना ई-निविदा न मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आहे. ठेका देण्यात घोटाळा व्हावा, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे.

IPL_Entry_Point

विभाग