मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Cbi Arrested Delhi Deputy Cm Manish Sisodia After Eight Hours Questioning Delhi Excise Policy Scam

Manish Sisodia: दिल्लीत AAP ला मोठा धक्का; उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, CBI ची मोठी कारवाई

मनीष सिसोदिया यांना अटक
मनीष सिसोदिया यांना अटक
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Feb 26, 2023 08:14 PM IST

manish Sisodia arrested by CBI : सीबीआयनेअखेरदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियायांना अटक केली आहे.सीबीआयने सिसोदियायांची जवळपास ८ तास चौकशी केली.

सीबीआयने अखेर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियायांना अटक केली आहे. सीबीआयने सिसोदिया यांची जवळपास ८ तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळापूर्वी त्यांना अटक केली. मनीष सिसोदिया यांची दिल्लीतीलकथित दारू घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू होती. यापूर्वी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आज (रविवार) चौकशीच्या आधी मनीष सिसोदिया यांनी शक्यता वर्तवली होती की, त्यांना अटक केली जाऊ शकते. त्याचबरोबर सिसोदिया यांनी शंका व्यक्त केली होती की, त्यांना ७ ते ८ महिन्यांचा कारावास होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सीबीआय कार्यालयातचौकशीसाठीजाण्यापूर्वीसिसोदिया यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले होते व त्यानंतर राजघाटवर गेले होते. राजघाटवर सिसोदिया महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तकझाले होते. घरातून बाहेर पडताना सिसोदिया यांनी हसत हसत विजयी चिन्ह दाखवले होते.

या पुराव्यांच्या आधारे सिसोदिया यांना अटक -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराव्याच्या आधारे मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.चौकशीदरम्यान सीबीआयने त्यांना काही कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यासह अनेक पुरावे दाखवले.या पुराव्यांसमोर सिसोदिया कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.

पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. यात सिसोदिया यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. याशिवाय या प्रकरणात त्या नोकरशहाचे वक्तव्यही महत्त्वाचे आहे, ज्यांनी सीबीआयला दिलेल्या निवेदनात सिसोदिया यांनी अबकारी धोरण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले होते.

केजरीवाल यांचे ट्विट -

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटलं की, 'मनीष देव तुझ्या पाठीशी आहे. लाखो मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात गेल्यावर तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तुम्ही लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. दिल्लीची मुले, पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.

 

आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले की, "जे गरीब मुलांना चांगले शिक्षण देतात आणि त्या मुलांचे भविष्य घडवणारे तुरुंगात असतात आणि अब्जावधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे जवळचे मित्र असतात तेव्हा देशाची प्रगती कशी होईल?"

 

WhatsApp channel