Viral News: सोशल मीडियावर कधी काही व्हायरल होईल, हे सांगणे कठीण आहे. काही दिवसांपूर्वी एका बैलाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सुदैवाने, या घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. अशाच एका घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला पाहून एका बैलाला राग येतो आणि दुचाकीला धडक देतो.दुचाकीस्वाराने दाखवलेल्या हुशारीमुळे त्याचे प्राण वाचले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण या भीषण धडकेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. व्हिडिओत एक बैल रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या बाजूने एक व्हॅन जात आहे. यानंतर या बैलाच्या समोरून एक दुचाकी येते. दुचाकीला पाहताच बैल भडकतो आणि दुचाकीला धडक देतो. मात्र, त्यापूर्वी दुचाकीस्वारला बैलाच्या हल्ल्याची जाणीव होते आणि लगेच दुचाकी रस्त्यावर सोडून बाजूला होतो. त्यानंतर बैल बराच वेळ दुचाकीवर बसून राहतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@MojClips या ट्विटर नावाच्या अकांऊटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बैलाला राग का आला? असे लिहिण्यात आले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, 'दुचाकीस्वार विनाकारण हॉर्न वाजवत असेल, म्हणून बैलाला राग आला.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'भाऊ थोडक्यात वाचला, नाहीतर दुचाकीसह त्यालाही बैलाने फेकून दिले असते.' तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'ही खूप भनायक गोष्ट आहे. बैलाने त्या व्यक्तीला सहज उडवले असते, त्याला आपला जीव देखील गमवावा लागला असता.'
बुलढाण्यातील सिव्हील लाइन भागातील श्रीराम नगरात गेल्या महिन्यात मोकाट बैलाने धडक दिल्याने एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिला घरासमोर झाडत असताना बैलाने त्यांना जबर धडक दिली. या घटनेत वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पाठीचा मणका देखील क्षतीग्रस्त झाला. या घटनेनंतर महिलेला ताबडतोब खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील मोकाट जनावरांकडे नगरपालिका प्रशसन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अशा जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट वाढला आहे, ज्यांच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.