Passenger Smoked In IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाच्या राष्ट्रीय राजधानीतून आर्थिक राजधानीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
१७६ प्रवाशांना घेऊन हे विमान सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास दिल्ली विमानतळावरून रवाना झाले. मुंबई विमानतळावर उतरण्याच्या ५० मिनिटे आधी खलील काजमुल खान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी शौचालयात गेला. खान यांनी टॉयलेटमध्ये सिगारेट ओढल्यानंतर केबिन क्रूला स्मोक सेन्सरने सतर्क केले. जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा क्रू मेंबर्सने स्वच्छतागृहाची पाहणी केली, तिथे एक माचिस आणि सिगारेटचा स्टब सापडला. त्यांनी आपल्या वरिष्ठांना या निष्कर्षांची माहिती दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले. क्रू मेंबर्सने चौकशी केली असता खानने शौचालयात धूम्रपान केल्याची कबुली दिली.
विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा रक्षकांना याची माहिती देण्यात आली आणि खान यांना सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. खानविरोधात भारतीय दंड संहिता आणि विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ च्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. हाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. यानंतर विमानाची उड्डाणे शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. छत कोसळण्याच्या घटनेनंतर लगेचच विमानांचे प्रस्थान थांबवण्यात आले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रस्थान पूर्णपणे बंद करण्यात आले. विमानांच्या आगमनावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, जखमींची माहिती मिळाली असून आपत्कालीन कर्मचारी जखमींना आवश्यक ती सर्व मदत आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून टर्मिनल १ मधून निघणारे सर्व प्रस्थान तात्पुरते स्थगित करण्यात आले असून चेक-इन काउंटर बंद करण्यात आले. या व्यत्ययाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि गैरसोयीबद्दल माफी मागतो, असे प्रवक्त्याने म्हटले आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. टी-१ दिल्ली विमानतळावरील छत कोसळण्याच्या घटनेवर मी स्वत: लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रथम प्रतिसाद देणारे कार्यरत आहेत. तसेच विमान कंपन्यांना टी १ येथे सर्व बाधित प्रवाशांना मदत करण्याचा सल्ला दिला.
संबंधित बातम्या