Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण-caretaker beat dog in lift attack face many times gurugram society dog brutality beat dog video viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

May 14, 2024 06:08 PM IST

Viral Video : कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये इमानदार प्राणी समजला जातो. मात्र, या मुक्या जनावरासोबत एकाने लिफ्टमध्ये क्रूर कृत्य केले. कुत्र्याला त्याच्या केअरटेकरने बेदम मारहाण केली असून ही घटना लिफ्टमधल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुक्या प्राण्यावर क्रूरता! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
मुक्या प्राण्यावर क्रूरता! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच नोएडामध्येही एका कुत्र्याने लिफ्टमध्ये एका मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुत्राच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी लिफ्ट मधील मारणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका कुत्र्याला लिफ्टमध्ये बेदम मारहाण केल्याचे पुढे आले आहे. या व्हीडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संतत्प भावना व्यक्त केल्या आहेत. एका कुत्र्याचा केअरटेकरने क्रूरतेचा कळस गाठत  लिफ्टमध्ये कुत्र्याच्या तोंडावर अनेक वेळा  काठीने हाताने मारहाण केली असल्याचे  दिसत आहे. ही घटना गुरुग्राममधील येथील असून या प्रकरणी कुत्र्याच्या केअरटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल २० वेळा काठीने मारले तोंडावर फटके

व्हायरल झालेला हा व्हिडिओ तब्बल ४१ सेकंदाचा आहे, या व्हायरल व्हिडिओमध्ये लिफ्टमध्ये एक माणूस त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत असल्याचे दिसून येते. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असून तो आरोपी केअरटेकरच्या हातात आहे. दरम्यान, अचानक कुत्र्याचा मालक कुत्र्याला विनाकारण तोंडावर फटके मारायला लागतो. सुमारे २० वेळा त्याने काठीने कुत्र्याच्या तोंडावर फटके मारले असल्याचे दिसत आहे, याशिवाय त्याने हाताने देखील कुत्र्याला मारहाण केली. हा संपूर्ण व्हिडिओ अस्वस्थ करणारा आहे. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, गुरुग्राम सेक्टर ५४ च्या ऑर्किड गार्डन सोसायटीची ही घटना घडली आहे. कुत्र्याच्या मालकाने केअर टेकरविरोधात पोलिस तक्रार केली नसून त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

कुत्र्याचा मुलीवर हल्ला

आणखी एका घटनेत, नोएडामधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये घुसून कुत्र्याने एका अल्पवयीन मुलीला चावा घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोसायटीच्या परिसरात कुत्र्यांना मोकळेपणाने फिरू दिल्याने मालकांवर दंड आकारण्याची मागणी सोसायटीच्या इतर नागरिकांनी ले आहे. ही घटना ३ मे रोजी नोएडातील सेक्टर १० मधील लोटस ३०० सोसायटीमध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ हा बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये, लिफ्टमध्ये सुमारे १० वर्षांची मुलगी एकटी असल्याचे दिसत आहे, जेव्हा लिफ्टचा दरवाजा उघडतो यावेळी एक पाळीव कुत्रा लिफ्टमध्ये प्रवेश करून मुलीवर हल्ला करून तिच्या उजव्या हाताला चावल्याचे दिसत आहे. यानंतर संबंधित कुत्र्याचा मालक या कुत्र्याला पकडून त्याला घेऊन जातो. या व्हीडिओत कुत्र्याने चावा घेतलेली मुलगी ही वेदनेने ओरडत असल्याचे दिसत असून तिने कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी घाबरलेल्या अवस्थेत लिफ्टचे दार बंद करतांना दिसते. काही वेळाने कुत्रा पुन्हा येऊन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात असतो मात्र, लिफ्टचा दरवाजा वेळेवर बंद झाल्याने ही मुलगी बचवली.

विभाग