टायर फुटल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली; सासू-सुनेचा मृत्यू, अपघाताचा थरारक CCTV समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  टायर फुटल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली; सासू-सुनेचा मृत्यू, अपघाताचा थरारक CCTV समोर

टायर फुटल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली; सासू-सुनेचा मृत्यू, अपघाताचा थरारक CCTV समोर

Feb 26, 2024 04:07 PM IST

Purvanchal Expressway Accident : कारचे टायर फुटल्याने भरधाव कार समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Purvanchal Expressway Accident
Purvanchal Expressway Accident

भरधाव कारचे टायर फुटल्याने कार समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झाला. या भीषण अपघाताची घटना महामार्गावरील सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या अपघातात एकाच कुटूंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन महिला या सासू आणि सून असल्याचे म्हटले होते. हा अपघात रविवारी पूर्वांचल महामार्गावर माईलस्टोन ८९ जवळ झाला. अपघातग्रस्त कुटुंब काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी वाराणसीला जात होते. परंतु रस्त्यातच टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, एक्सप्रेस वेवर भरधाव कार ट्रकला पाठीमागून धडक देऊन रस्त्याकडेला पलटी झाली.

कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन समोरून जाणाऱ्या ट्रकवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकला धडकल्यानंतर कार महामार्गावर दोन ते तीन वेळा पलटी झाली व त्यानंतर दुभाजकावर आदळली. या अपघातात एक बालक सुखरूप बचावल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर