मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १२ वर्षांच्या मुलीसह कार कुंडांत कोसळली, मुलीला वाचवायला वडिलांचीही पाण्यात उडी; पाहा थरारक VIDEO

१२ वर्षांच्या मुलीसह कार कुंडांत कोसळली, मुलीला वाचवायला वडिलांचीही पाण्यात उडी; पाहा थरारक VIDEO

Aug 08, 2023 12:20 AM IST

Madhya Pradesh News : एक कुटूंब पिकनिकसाठी कारमधून सिमरोलजवळ लुधिया कुंडगेला होता. तेथे कार अचानक थेटकुंडात कोसळली. याघटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

lodhiya kund video viral
lodhiya kund video viral

मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या कुटूंबाचा अपघात झाला आहे. ही घटना रविवार सायंकाळच्या सुमारास घडली आहे. हे कुटूंब पिकनिकसाठी कारमधून सिमरोलजवळ लुधिया कुंड येथे गेले होते. तेथे कार अचानक थेट कुंडात कोसळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कार कुंडात कोसळताना दिसत आहे. त्यानंतर मदत व बचाव दलाने कुंडाच्या पाण्यातून कारमधील कुटूंबाला बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार कुंडात कोसळल्यानंतर तेथे किंकाळ्या ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये वाचवा.. वाचवा असा आवाज येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लोधिया कुंड येथे घडली आहे. रविवारी सुट्टी असल्याने तैयब अली पत्नी झेहरा आणि १२ वर्षांची मुलगी जौनक सोबत कुंडावर आले होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीतून आणखी एक कुटूंब आले होते. तैयब यांनीहँड ब्रेक लावून तलावाच्या काठावर कार उभी केली होती व पत्नी व मुलीसह खाली उतरले होते.

 

ट्रेंडिंग न्यूज

गाडी कुंडाच्या उतारावर उभी केली होती. तलावामध्ये अंघोळ करून कपडे बदलत असताना गाडीचा हँड ब्रेक आपोआपच निघून गेला. यादरम्यान जौनक कारमध्ये एकटीच होती. उतारामुळे गाडी काही वेळातच तलावातमध्ये कोसळली. कार कुंडाच्या पाण्यात पडली. त्यावेळीचालकाच्या बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे मुलगी गाडीतून कुंडात पडली. मात्र तिला पोहता येत नव्हते. हे पाहून तेथे गोंधळ माजला.

तैयब अली यांनी मुलीला वाचवण्यासाठी कुंडात उडी मारली.पत्नी झेहराने पती आणि मुलीला वाचवण्याची विनवणी सुरू केली. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी पाण्यात उड्या घेत मुलीला आणि तिच्या वडिलांना बाहेर काढले.

WhatsApp channel