Canara Bank Apprentice Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँक अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी शनिवारी (२१ सप्टेंबर २०२४) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कॅनरा बँकेची अधिकृत वेबसाइट canarabank.com येथे भेट देऊ शकतात. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीसाठी बँकेत अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी www.nats.education.gov.in अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अप्रेंटिसशिप पोर्टलवर १०० टक्के पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र ठरतील. नॅट्स पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया १८ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपला फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा स्कॅन करावी. हे सर्व तपशील व्यवस्थित स्कॅन केले पाहिजेत आणि धूसर किंवा अस्पष्ट असू नयेत, याची काळजी घ्यावी.
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. पेमेंट डेबिट कार्ड (रुपे / व्हिसा / मास्टरकार्ड / मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड किंवा मोबाइल वॉलेटवापरुन केले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी उमेदवार कॅनरा बँकेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. एनटीपीसी लिमिटेडने डेप्युटी मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एनटीपीसीची अधिकृत वेबसाइट ntpc.co.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेमुळे संस्थेतील २५० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.