General Knowledge: देशात प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळा कायदा आणि त्यासाठी शिक्षेची भारतीय संविधानात तरतूद आहे. परंतु, तु्म्हाला माहिती आहे का, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याआधी एफआयआर का नोंदवला जातो? एफआयआरशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येत नाही का? महिलांसाठी काय नियम आहेत? आज आपण त्यामागचे उत्तर जाणून घेऊयात.
कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याआधी पोलीस अगोदर एफआयआर दाखल करतात. त्यानंतर पुढील तपासाला सुरुवात केला. मात्र, काही प्रकरणांत एफआयआर दाखल न करताही तपास करू शकतात. परंतु, एफआयआर दाखल न केल्यास पोलिसांना त्याबाबत अधिकृत कारवाई करता येऊ शकत नाही. अटक करण्याबाबतचे नेमके नियम काय आहेत आणि एफआयआर दाखल न करताच अटक होऊ शकते का? याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यामागे काही ठोस कारण असायला हवे. भारतीय दंडसंहितेनुसार म्हणजेच सीआरपीसीच्या कलम ५० (१) नुसार पोलिसांना अटकेच्या आधी कारण सांगणे बंधनकारक असते. एखाद्या व्यक्तीला अटक करून पोलीस ठाण्यात ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करावी लागते. तसे न केल्यास पोलिसांवर कारवाई करता येते.
नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार पोलीस समोरच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करतात. त्यानंतर पुढील तपासाला सुरूवात करून आरोपीविरोधात पुरावा गोळा करतात. पुरावा सापडल्यानंतरच अटक केली जाऊ शकते. पण काही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींना वॉरंटशिवाय अटक केली जाऊ शकते. पण गुन्हा गंभीर स्वरुपाचा नसेल तर, एफआयआर आणि वॉरंट गरजेचे असते.
सीआरपीसीच्या कलम ४६ नुसार, एखाद्या महिला आरोपीला केवळ महिला पोलीसच अटक करू शकतात. एवढेच नव्हेतर, महिलांना सूर्योदयाआधी व सूर्यास्तानंतर अटक करता येऊ शकत नाही. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार पोलिसांना अटकेबाबतचे अधिकार असतात. जर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असेल तर, पोलीस एफआयआर किंवा वॉरंटशिवाय अटक करू शकतात.