Viral News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील एक व्यक्ती सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. जगातील सर्वात जास्त शुक्राणूदान करणारी व्यक्ती म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. काइल गॉर्डीला (वय ३२) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या या कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे. सध्या तो जगातील विविध देशांमध्ये असलेल्या ८७ मुलांचा बाप आहे. तर एका अंदाजानुसार गोर्डी या वर्षाच्या अखेरपर्यंत १०० मुलांचा बाप होणार आहे.
स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जगातील केवळ तीन जणांना १०० मुलांचा बाप होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, यावरही त्याचं समाधान झालेलं नाही. द स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, गॉर्डीला यापुढेही आपले शुक्राणू दान करायचे आहेत. "मला हे आवडते की मी या सर्व महिलांना आई होण्याचा सन्मान दिला आहे. जेव्हा त्यांनी मूल होण्याची आशा सोडली होती,असे काइल म्हणाला. पण मला अजूनही जगाच्या एकूण लोकसंख्येवर फारसा प्रभाव पाडता आलेला नाही त्यामुळे मी यापुढे देखील या माध्यमातून प्रयत्न करत राहील असे काइल याने म्हटलं आहे.
काईलच्या शुक्राणूंद्वारे जन्माला आलेले सर्वात मोठं मूल सध्या १० वर्षांचं आहे. त्याला या माध्यमातून आणखी किती मुलांना जन्म द्यायचा आहे, हे त्याने अद्याप ठरवलेले नाही. " मी प्रामाणिक असून हे काम मी सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत लोकांना माझी गरज आहे तोपर्यंत मी स्पर्म डोनेट करत राहील.
सध्या इंग्लंड, स्कॉटलंड, स्वीडन आणि नॉर्वे या देशांमध्ये त्यांची १४ मुले आहेत. २०२५ मध्ये जपान, आयर्लंड आणि युरोपसारख्या देशांमध्ये देखील स्पर्म डोनेट करण्याची इच्छा काईलने व्यक्त केली आहे. "मी जपान आणि आयर्लंडमधील काही महिलांशी बोललो असून या बाबत त्यांनी होकार दिला असल्याचे त्याने सांगितले. सध्या या देशात या देशांमध्ये माझी मुलं नाहीत, असे देखील काइल म्हणाला.
संबंधित बातम्या