मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. सेक्स करताना ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, प्रेयसीने मृतदेह पिशवीत भरून रस्त्यावर फेकला
सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

धक्कादायक.. सेक्स करताना ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, प्रेयसीने मृतदेह पिशवीत भरून रस्त्यावर फेकला

24 November 2022, 19:42 ISTShrikant Ashok Londhe

एका ६७ वर्षीय व्यक्तीचा ३५ वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध करत असताना मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बेंगळुरूमधील आहे.

मागच्या आठवड्यात बेंगळुरूच्या जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह  आढळला होता. आता पोलिसांनी त्या ६७ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.१७ नोव्हेंबर रोजी ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्याच्या मृत्यूचे रहस्य समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, ६७ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू एपिलेप्टिक अटॅकमुळे म्हणजेच सेक्स दरम्यान ब्रेन स्ट्रोकमुळे झाला. यानंतर त्याची प्रेयसी व तिच्या पतीने व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिला. व्यावसायिकाच्या फोन कॉलच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी हा खुलासा केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी सांगितले की, फोन डिटेल्स आणि लोकेशन तपासल्यावर तो व्यापारी त्याच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रिणीची ओळख उघड केली जात नाही. जेपी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ६७ वर्षीय व्यावसायिकाचे ३५ वर्षीय महिलेशी संबंध होते. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मृत व्यक्ती तिच्या घरी पोहोचला. येथे दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि याच दरम्यान व्यावसायिकाचा मृत्यू झाला. यामुळे त्याची प्रेयसी घाबरली तिने विचार केला की, या मृत्यूची माहिती कोणाला समजल्यास तिची समाजात बदनामी होईल. 

भीतीपोटी महिलेने पती आणि भावाला फोन केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या लोकांनी घटनास्थळी पोहोचून व्यावसायिकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन भागात फेकून दिला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ते आपल्या सूनेला भेटण्याचे कारण सांगून घरातून निघून गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तो माणूस अनेक आजारांनी ग्रस्त होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, सध्या या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

विभाग