girl rejected property worth rs 2500 crore for her love : प्रेम हे आंधळे असते असे म्हटले जाते. प्रेमात मश्गुल झालेले प्रियकर आणि प्रेयसी हे एकमेकांसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. अशीच एक प्रेम कहाणी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये समोर आली होती. आता त्यानंतर मलेशियातील एका तरुणीने आपल्या प्रियकरांसाठी वाडिलांची तब्बल २५०० कोटी रुपयांची संपत्ती लाथाडली आहे.
मलेशियन उद्योगपतीच्या मुलीने तिच्या प्रियकरसाठी २५०० कोटींची संपत्ती नाकारली आहे. तिच्या या प्रेमाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. माजी मिस मलेशिया पॉलिना चाय आणि प्रसिद्ध उद्योगपती खुके पेंग यांची मुलगी अँजेलिना फ्रान्सिसने तिच्या आई वडिलांची २५०० कोटींची संपत्ती सोडून आपल्या प्रियकराशी लग्न केले. अँजेलिना आणि तिच्या प्रियकारच्या लग्नाला तिच्या आईवडिलांचा विरोध होता. मात्र, हा विरोध धुडकावत अँजेलिनाने तिच्या प्रियकराशी लग्न केले.
अँजेलिनाला तिचा प्रियकर जेदेडिया सोबतच लग्न करायचे होते. जेद्दियाचे वडील खू कॉर्स हॉटेलचे संचालक आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना जेडेडिया आणि अँजेलिना एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, अँजेलिना ही कोट्यधीशाची मुलगी होती तर जेडेडिया हा सामान्य कुटुंबातील मुलगा होता. तिने तिच्या प्रेमाबद्दल घरी सांगितले. मात्र, अँजेलिनाच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. दरम्यान, अँजेलिना ही जेडेडियाशी लग्न करण्यावर ठाम होती. दरम्यान, मुलीचा हट्ट पाहून अँजेलिनाच्या वडिलांनीही एक अट घातली. जर तिला जेदेडियाशी लग्न करायचे असेल तर तिला वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचा त्याग करावा लागेल.
अँजेलिनाने देखील ही अट मान्य केली. तिने तिची २५०० कोटींची संपत्ती सोडून तिचे प्रेम जेडेडियाची निवड केली. दोघांनी २००८ मध्ये लग्न केले आणि तेव्हापासून ते एकत्र राहत आहेत. अँजेलिनाच्या पालकांचाही नंतर घटस्फोट झाला. यानंतर अँजेलिनाने कोर्टात आईची बाजू घेतली. अशा परिस्थितीत ती आपोआपच वडिलांच्या मालमत्तेपासून वेगळी झाली. मलेशियन अँजेलिनाने तिच्या प्रेमासाठी जीवनातील विलासी आणि संपत्ती नाकारली. त्याचप्रमाणे २०२१ मध्ये जपानच्या राजकुमारी माकोनेही तिच्या प्रेमासाठी शाही संपत्ती नाकारली होती.