बसचे टायर फुटल्याने हवेत उडाला चालक, मृत्यूच्या घटनेचे Live फुटेज व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बसचे टायर फुटल्याने हवेत उडाला चालक, मृत्यूच्या घटनेचे Live फुटेज व्हायरल

बसचे टायर फुटल्याने हवेत उडाला चालक, मृत्यूच्या घटनेचे Live फुटेज व्हायरल

Feb 21, 2024 10:49 PM IST

Bus Accident Video Viral : बस टायरच्या स्फोटानंतर बसचा चालक हवेत उडाला व जवळपास १० फुट वर हवेत उडून जमिनीवर आपटला.

Bus Accident Video Viral
Bus Accident Video Viral

राजस्थानमधील अजमेरमधून मन सुन्न करणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रूपनगड परिसरात मंगळवारी एका बसचे टायर फुटले होते. या स्फोटानंतर बसचा चालक हवेत उडाला व जवळपास १० फुट वर हवेत उडून जमिनीवर आपटला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बोदूराम जाट (५०) असे मृत चालकाचे नाव आहे. मृताच्या छोट्या भावाने सांगितले की, बोदूराम सोमवारी बस घेऊन निघाले होते. मंगळवारच्या सकाळी बसचे एक टायर पंचर झाले होते. त्यामुळे एका हॉटेलच्या समोर थांबून ते टायर दुरुस्त करत होते. यावेळी टायरचा स्फोट झाला आणि तेथे उभे असलेले बोदूराम हवेत उडाले. १० फूट उंच उडून जमिनीवर आपटले.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज -

मिळालेल्या माहितीनुसार, टायर फुटल्यानंतर दूरपर्यंत याचा आवाज आला. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या १ मिनिट ४० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दिसते की,बसजवळ एक व्यक्ती उभा आहे. त्याचवेळी स्फोट झाला व तो व्यक्ती हवेत उडाला. व्यक्ती खाली पडल्यानंतर त्याच्यावर टायरचे अवशेष कोसळले. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी बसच्याटायरमध्ये हवा भरली जात होती, तेव्हा लोक आतमध्ये बसले होते. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहपोस्टमार्टमसाठी पाठवला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर