मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bus Accidnt : जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून १२ लोकांचा मृत्यू, २५ जखमी

Bus Accidnt : जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून १२ लोकांचा मृत्यू, २५ जखमी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 14, 2022 10:20 PM IST

Bus Accidnt In JK : अपघातग्रस्त बस ही सौजियानमधून मंडी येथे जात असताना अचानक एका खोल दरीत कोसळली.

bus accident in jammu kashmir
bus accident in jammu kashmir (HT)

bus accident in jammu kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याशिवाय २५ जण जखमी झाले असून त्यात काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पूंछ जिल्ह्यातल्या सौजियानमधून मंडी येथे जात होती, त्यावेळी एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खोल दरीत बस कोसळली, प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याशिवाय या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात जे लोक जखमी झाले आहेत, त्यांना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दुर्दैवी घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

WhatsApp channel